नलु मावशीवर व्हायरल झालेल्या फनी मिम्सचा सोशल मीडियावर धुमाकुळ, हसून हसून व्हाल लोटपोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 13:36 IST2021-10-06T13:21:57+5:302021-10-06T13:36:03+5:30

मराठी मालिका विश्वात सध्या ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेची प्रचंड चर्चा होते. अनेकदा मालिकेवर लोकं आपले विचार मांडताना दिसतात.

Funny Memes going viral on Nallu Mavshi Of Yeu Kashi Tashi Me Nandayla, check why so | नलु मावशीवर व्हायरल झालेल्या फनी मिम्सचा सोशल मीडियावर धुमाकुळ, हसून हसून व्हाल लोटपोट

नलु मावशीवर व्हायरल झालेल्या फनी मिम्सचा सोशल मीडियावर धुमाकुळ, हसून हसून व्हाल लोटपोट

सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियावर वारंवार सेलिब्रेटींवर बनवण्यात येणारे मिम्स व्हायरल होत असतात. मुळात या मिम्सना नेटीझन्सची प्रचंड पसंती मिळताना दिसते. गेल्या काही दिवसांपासून मराठी मालिका आणि त्यातले गाजलेल्या व्यक्तिरेखा यांवरही तुफान मिम्स व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळते. हे मिम्स वाचून नेटीझन्सही हसून हसून लोटपोट हसत असल्याचे पाहायला मिळते. त्यातही गाजलेली व्यक्तिरेखा असेल तर मग अधिक पसंती त्या मिम्सना मिळाली म्हणजेच समजा. 

मराठी मालिका विश्वात सध्या ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेची  प्रचंड चर्चा होते. अनेकदा मालिकेवर लोकं आपले विचार मांडताना दिसतात. मालिकेमुळे मालिकेतल्या कलाकारांनाही वेगळी ओळख मिळाली आहे. घराघरात आज हे कलाकार प्रसिद्ध झाले आहेत. मालिकेला रसिकांची पसंती असली तरी अनेकदा न आवडलेल्या गोष्टी दाखवल्यामुळे मालिका ट्रोलही होते.अनेकदा रसिक संतापही व्यक्त करताना दिसतात. 

सध्या छोट्या पडद्यावरच्या ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिका प्रचंड गाजत आहे.मालिकेतल्या सगळ्याच कलाकारांच्या भूमिकांना रसिकांची पसंती मिळत आहे. यात विशेष उल्लेख करावा लागेल तो नलू मावशी म्हणजे दिप्ती केतकरचा. नलू मावशी या भूमिकेला रसिकांची विशेष पंसती मिळत आहे.

सोशल मीडियावर तिचे विविध लूक व्हायरल होत असतात. पण ऑफस्क्रीन लूकपेक्षा चर्चा होते ती ऑनस्क्रीन लूकचीच. मालिकेत नलु मावशीचा लूक इतका चर्चेत असतो की, त्यावर नेटीझन्स भन्नाट विनोदी मिम्स बनवत व्हायरल करताना दिसतात. सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला नलु मावशीवर बनवलेले मिम्स पाहायला मिळतील.

नलु मावशीचा ऑनस्क्रीन लूक रसिकांना खटकत असला तरी रिअल लाईफमध्ये मात्र मात्र नलु मावशी म्हणून फेमस झालेली दीप्ती खूपच ग्लॅमरस आहे. रिअल लाईफमधला तिचा लूक पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल इतकी ती दिसायला सुंदर दिसते.

सोशल मीडियावर विविध अंदाजातील फोटो तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक लूकवर चाहते कमेंट्स लाईक्स करत पसंती देतात. रिअल लाईफ लूक हिट असला तरी रिल लाईफ लूक मात्र अनेकदा ट्रोलही करण्यात येतो. 

Web Title: Funny Memes going viral on Nallu Mavshi Of Yeu Kashi Tashi Me Nandayla, check why so