'बिग बॉस मराठी ५'मध्ये परदेशी कलाकार इरिना रुडाकोव्हाची एन्ट्री, मराठी बोलण्याचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 22:28 IST2024-07-28T22:28:24+5:302024-07-28T22:28:47+5:30

'बिग बॉस मराठी ५' मध्ये परदेशी कलाकार इरिना रुडाकोव्हाची शानदार एन्ट्री झालीय

foreign artist Irina Rudakova in Bigg Boss Marathi 5 riteish deshmukh colors marathi | 'बिग बॉस मराठी ५'मध्ये परदेशी कलाकार इरिना रुडाकोव्हाची एन्ट्री, मराठी बोलण्याचं कौतुक

'बिग बॉस मराठी ५'मध्ये परदेशी कलाकार इरिना रुडाकोव्हाची एन्ट्री, मराठी बोलण्याचं कौतुक

'बिग बॉस मराठी ५' मध्ये परदेशी कलाकार इरिना रुडाकोव्हाची एन्ट्री झालीय. इरिना ही परदेशी कलाकार असून ती गेल्या अनेक वर्षांपासून भारतात राहत आहे. याशिवाय तिला मराठीही चांगलं बोलता येतं. इरिना ही मॉडेल आहे. याशिवाय ती IPL ची चिअर गर्ल आहे. इरिनाने छोटा पुढारीसोबत घरात एन्ट्री केलीय. इरिनाचे सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर १ लाखांपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

इरिनाची घरात एन्ट्री

इरिनाने घरात एन्ट्री करताच तिच्या मराठी बोलण्याचं सर्वांनी कौतुक केलंय. इरिनाने घरात आल्यावर बिग बॉससाठी खास उखाणा घेतला. यंदा बिग बॉस मध्ये काहीच मोफत मिळणार नाहीए. सगळ्या गोष्टींसाठी स्पर्धकांना किंमत मोजावी लागणार आहे. बेडरुम, बाथरुम, किचन सगळीकडे पैसे भरावे लागणार आहेत. यासाठी १० हजार बिग बॉस करन्सीचा समावेश करण्यात आला आहे. यासोबत पॉवर कार्डही आहे. पॉवर कार्ड घेतलं तर कोणतीही ड्युटी करण्याची गरज नाही.


Web Title: foreign artist Irina Rudakova in Bigg Boss Marathi 5 riteish deshmukh colors marathi