पहिल्यांदाच 'दया भाभी'च्या लेकीचा फोटो आला समोर,बघा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2018 12:51 IST2018-02-03T07:21:22+5:302018-02-03T12:51:22+5:30

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील दया भाभीच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री दिशा वाकाणीने 30 नोव्हेंबर रोजी मुंबईतील ...

For the first time, there is a photo of 'Dana Bhabhi', see photo | पहिल्यांदाच 'दया भाभी'च्या लेकीचा फोटो आला समोर,बघा फोटो

पहिल्यांदाच 'दया भाभी'च्या लेकीचा फोटो आला समोर,बघा फोटो

'
;तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील दया भाभीच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री दिशा वाकाणीने 30 नोव्हेंबर रोजी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात मुलीला जन्म दिला होता.मुलीच्या जन्माच्या दोन महिन्यांनी म्हणजे जानेवारी महिन्यात दिशा तिच्या माहेरी अहमदाबाद येथे आली होती.येथे तिने मुली आणि पतीसोबत जामनगरच्या नागेश्वर मंदिरात देवीचे दर्शन घेतले.यानिमित्ताने पहिल्यांदाच दिशाच्या लाडक्या लेकीचे फोटो समोर आले आहेत.यावेळी दिशा हिरव्या रंगाच्या साडी परिधान केली होती. मंदिरात दिशाला पाहताच चाहत्यांनी तिच्यासह फोटोही काढण्याचा आनंद लुटला.दिशाने 24 नोव्हेंबर 2015 मध्ये मयुर पांड्यासोबत लग्न केले. मयुर हा चार्टड अकाऊंटट आहे. दिशा आज तिच्या आयुष्यात खूपच खूश आहे. दिशा 2008 पासून 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत काम करत आहे.दिशा खिचडी या मालिकेत अनेक छोट्या भूमिकांमध्ये झळकली होती. पण तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील 'दया' या भूमिकेने तिला प्रेक्षकांचे प्रचंड लोकप्रियता मिळाली.तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत.ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे आणि त्यामुळे या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना त्यांच्यातील एकच वाटू लागल्या आहेत आणि त्यातही या मालिकेतील दयाबेन ही भूमिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते.आज रसिक दिशाला द्याबेन म्हणूनच जास्त ओळखतात. 

 

दिशाच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.एवढेच नव्हे तर तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील तिचा ऑनस्क्रीन मुलगा टप्पू देखील या कार्यक्रमासाठी आर्वजून आला होता.या मालिकेत भव्या गांधीने टप्पूची भूमिका साकारली होती.आज भव्या या मालिकेत नसला तरी त्याचे दिशासोबतचे बाँडिंग कायम आहे.त्याने दिशाच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचा एक क्यूट फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला होता.आता दया बेन मालिकेत कधी परतणार याकडेही सा-यांचे लक्ष लागले आहे.  

Web Title: For the first time, there is a photo of 'Dana Bhabhi', see photo