'फायर है मैं झुकेगा नहीं साला...'; 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील उदयने घेतला भन्नाट उखाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 19:02 IST2022-04-01T19:02:16+5:302022-04-01T19:02:34+5:30

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत उदय शिर्के पाटील(Uday Shirke Patil) ही भूमिका साकारणारा अभिनेता संजय पाटील (Actor Sanjay Patil ) नुकताच विवाह बंधनात अडकला आहे.

'Fire is, I will not bow down ...'; Sukh Mhanje Nakki Kay Asata Fame Uday Aka Sanjay Patil wedding video goes viral | 'फायर है मैं झुकेगा नहीं साला...'; 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील उदयने घेतला भन्नाट उखाणा

'फायर है मैं झुकेगा नहीं साला...'; 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील उदयने घेतला भन्नाट उखाणा

स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका गेल्या अनेक दिवसापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेमध्ये जयदीप आणि गौरी यांची प्रेम कथा दाखवण्यात आली आहे. त्या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. या मालिकेमध्ये गौरीची भूमिका अभिनेत्री गिरिजा प्रभू हिने साकारली आहे. तर जयदीप याची भूमिका अभिनेता मंदार जाधव याने साकारली आहे. या दोघांशिवाय इतर पात्रांनीदेखील रसिकांच्या मनात घर केले आहे.  या मालिकेतील कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. नुकतेच या मालिकेत उदयची भूमिका साकारणारा अभिनेता संजय पाटील लग्नबंधनात अडकला आहे. दरम्यान आता त्याने लग्नात घेतलेला जबरदस्त उखाणा चर्चेत आला आहे.

सुख म्हणजे नक्की काय असतंमध्ये उदयची भूमिका साकारणारा अभिनेता संजय पाटील याने नुकतेच लग्न केले. गर्लफ्रेंड अबोली गोखले हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. त्याच्या लग्नाला अनेक कलाकार देखील उपस्थित होते. विशेष करून सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील कलाकार त्याच्या लग्नाला गेले होते. त्याने लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 


यावेळेस संजय पाटीलने एक जबरदस्त उखाणा घेतला. हा उखाणा म्हणजे त्याने पुष्पा चित्रपटातील फेमस डायलॉग फायर है मैं झुकेगा नही साला असा उखाणा घेत त्याने सगळ्यांची वाहवाह मिळवली आहे.


संजय पाटील आणि अबोलीचा साखरपुडा ५ नोव्हेंबर २०२१ रोजी पार पडला. अबोली ही एक वेलनेस ब्लॉगर आहे. तसेच ती पोषणतज्ञ, योग सल्लागारही आहे. या दोघांच्या फोटोंवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Web Title: 'Fire is, I will not bow down ...'; Sukh Mhanje Nakki Kay Asata Fame Uday Aka Sanjay Patil wedding video goes viral