शेवटी सलमान बोलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 10:24 IST2016-07-26T04:54:43+5:302016-07-26T10:24:43+5:30

झलक दिखला जा या कार्यक्रमाचा नववा सिझन नुकताच सुरू झाला आहे. हा कार्यक्रम सुरू झाल्यापासूनच काही ना काही वाद ...

Finally, Salman spoke | शेवटी सलमान बोलला

शेवटी सलमान बोलला

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">झलक दिखला जा या कार्यक्रमाचा नववा सिझन नुकताच सुरू झाला आहे. हा कार्यक्रम सुरू झाल्यापासूनच काही ना काही वाद आपल्याला ऐकायला मिळत आहे. या कार्यक्रमात सलमान युसुफ खान भाग घेणार आहे. सलमान स्पर्धक असण्यावर स्पर्धकांनी आक्षेप घेतलेला आहे. या कार्यक्रमाची स्पर्धक नोरा फतेहीच्या मते सलमान एक खूप चांगला डान्सर असून त्याने याआधीही या कार्यक्रमात भाग घेतलेला आहे. त्यामुळे त्याला स्पर्धक म्हणून पुन्हा संधी देणे हे अतिशय चुकीचे आहे. या वादावर सलमानने आपली बाजू मांडली आहे. सलमानच्यामते याआधीही झलकमध्ये अनेक डान्सरनी भाग घेतलेला आहे. त्यावेळी कोणीही आक्षेप घेतला गेला नव्हता आणि झलकमध्ये नृत्याइतके मतांना महत्त्व दिले जाते. या कार्यक्रमात अनेक प्रसिद्ध कलाकार आहेत, त्यांना मते खूप चांगली मिळणार यात काही शंकाच नाही. त्यामुळे मी स्पर्धक असणे यात काहीही चुकीचे आहे असे मला वाटत नाही असे सलमान सांगतो. 

Web Title: Finally, Salman spoke