अखेर नेहा करणार यशला माफ; पण सिम्मीमुळे पुन्हा येणार दोघांमध्ये दुरावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 15:13 IST2022-01-27T15:11:06+5:302022-01-27T15:13:36+5:30
Mazi tuzi reshimgath: यश आणि नेहाला विभक्त करण्यासाठी सिम्मी कोणता प्लॅन करणार?

अखेर नेहा करणार यशला माफ; पण सिम्मीमुळे पुन्हा येणार दोघांमध्ये दुरावा
छोट्या पडद्यावरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. सध्या या मालिकेत अनेक रंजक वळण येतं असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे यश नेहाची नाराजी दूर करायचा प्रयत्न करत आहे. यासाठी तो वाट्टेल ते करायला तयार होत असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे यश करत असलेला केविलवाणा प्रयत्न करुन नेहा अखेर त्याला माफ करते. परंतु, सिम्मी या मैत्रीत पुन्हा फूट पाडणार आहे.
मराठी सिरिअल टीआपी पेज यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये नेहा यशला माफ करणार असल्याचं म्हटलं आहे. परंतु, सिम्मी या दोघांच्या मैत्रीत पुन्हा फूट पाडणार असून त्यांचं नातं तोडायचा प्रयत्न करणार आहे.
दरम्यान, आता यश आणि नेहाला विभक्त करण्यासाठी सिम्मी कोणता प्लॅन करणार? नेहा-यशची रेशीमगाठ पुन्हा तुटणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.