'सुपर डान्सर'च्या परीक्षकांसाठी चक्क फराह खानने स्वतः बनवून आणले घरचे जेवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 19:38 IST2019-03-15T19:38:00+5:302019-03-15T19:38:00+5:30
'सुपर डान्सर' शोच्या तिसऱ्या सीझनमधील 'गुरु-शिष्य' विशेष भागात फराह खान आली होती.

'सुपर डान्सर'च्या परीक्षकांसाठी चक्क फराह खानने स्वतः बनवून आणले घरचे जेवण
फराह खान वेगवेगळ्या भूमिकेसाठी नेहमी मेहनत घेते. तिची ओळख केवळ कोरिओग्राफर व दिग्दर्शिका एवढीच मर्यादित नाही. ती उत्तम कूकदेखील आहे. तिला स्वयंपाक करायला आणि मित्रमंडळींना आपल्या हाताचे खाऊ घालायला खूप आवडते. चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि मित्रमंडळींना तिच्या या खुबीविषयी चांगलेच माहित आहे. 'सुपर डान्सर' शोच्या तिसऱ्या सीझनमधील 'गुरु-शिष्य' विशेष भागात फराह खान आली होती. त्यावेळी पुन्हा एकदा तिच्या या गुणाचा प्रत्यय सर्वांना आला. त्यांनी यावेळी 'सुपर डान्सर्स'च्या परीक्षकांसाठी स्वतःच्या हाताने घरचे जेवण बनवून आणले होते.
फराहने सर्व जजेसना बजावले होते की यावेळी घरून कोणीही जेवण आणणार नाही. फराहने सर्वांसाठी यखनी पुलाव आणि आणखी काही चविष्ट खाद्य पदार्थ बनवून आणले होते. फराह आणि तीनही जजेसनी यावेळी एकत्र बसून जेवणाचा आनंद घेतला. इतकेच नाही तर या शोमधील स्पर्धकांचे डान्स व मेहनत पाहून फराह खूप प्रभावित झाली आणि तिने त्यांचे कौतूकदेखील केले.