कुंकुम भाग्यमधील प्रज्ञा चक्क बिकिनीवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 18:59 IST2017-01-10T18:49:01+5:302017-01-10T18:59:00+5:30

कुंकुम भाग्यमधील प्रज्ञा चक्क बिकिनीवर! छोट्या पडद्यावरील संस्कारी मुलगी म्हणून ओळखल्या जाणारी ‘कुंकुम भाग्य’मधील प्रज्ञा अर्थात स्रिती झा हिचे बिकिनीवरील फोटो व्हायरल झाले आहेत. सामाजिक माध्यमांमध्ये तिची असणारी प्रतिमा यामुळे बदलली गेली.

Fantastic luck in fortune luck! | कुंकुम भाग्यमधील प्रज्ञा चक्क बिकिनीवर!

कुंकुम भाग्यमधील प्रज्ञा चक्क बिकिनीवर!

ट्या पडद्यावरील संस्कारी मुलगी म्हणून ओळखल्या जाणारी ‘कुंकुम भाग्य’मधील प्रज्ञा अर्थात स्रिती झा हिचे बिकिनीवरील फोटो व्हायरल झाले आहेत. सामाजिक माध्यमांमध्ये तिची असणारी प्रतिमा यामुळे बदलली गेली. 
नवीन वर्षाच्या सुट्यांचा आनंद घेण्यासाठी स्रिती आपल्या मित्रांसह थायलंड येथे गेली होती. यापूर्वी स्रितीला अनेकांनी केवळ साडी आणि सलवार कमीज यामध्येच दर्शकांनी पाहिले आहे. स्रितीला या नव्या रुपात पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला. या छायाचित्रात स्रिती खूपच हॉट दिसत आहे. 





स्रितीने टू पिस बिकिनी घातली असून, या छायाचित्रात तिच्यासोबत मित्रही दिसत आहेत. रिल आणि रियल लाईफमधील तिची मैत्रीण लीना जुमानीही यावेळी उपस्थित होती. त्याशिवाय स्रितीचा बॉयफ्रेंड म्हणून ओळखला जाणारा कुणाल करण कपूरही छायाचित्रात दिसत आहे. 
स्रितीची मैत्रीण मौनी रॉयने इन्स्टाग्रामवर ही छायाचित्रे टाकली आहेत. एका चित्रात स्रिती आपला मित्र कुणाल कपूरसोबत दिसत आहे. अर्थात हे छायाचित्र अस्पष्ट दिसते आहे. थायलंडमधील टूर आटोपून या दोघी आता भारतामध्ये आल्या आहेत. या दोघी आता नव्याने ‘कुंकुम भाग्य’च्या सेटवर दिसत आहेत.





 

Web Title: Fantastic luck in fortune luck!