"तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती", प्रसिद्ध अभिनेत्रीचा Topless फोटो पाहून चाहत्यांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 14:21 IST2021-07-08T14:13:57+5:302021-07-08T14:21:08+5:30

‘कुमकुम भाग्य’ मालिकेमुळे शिखा सिंगला घराघरात ओळख मिळाली.गेल्यावर्षी तिने मुलीला जन्म.मुलीला जास्त वेळ देता यावा याच कारणामुळे सध्या तिने ब्रेक घेतला आहे.

Fans expresses their dissatisfaction over topless photos shared by Kumkum Bhagya Actress Shikha Singh | "तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती", प्रसिद्ध अभिनेत्रीचा Topless फोटो पाहून चाहत्यांचा संताप

"तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती", प्रसिद्ध अभिनेत्रीचा Topless फोटो पाहून चाहत्यांचा संताप

सोशल मीडियावर सेलिब्रेटींना ट्रोल करणे काही नवीन नाही. अनेकदा त्यांच्या फोटो किंवा व्हिडीओमुळे सेलिब्रेटींना सोशल मीडियावर नेटीझन्स ट्रोल करताना दिसतात. सेलिब्रेटींचा न आवडलेला अंदाज पाहून अनेकदा त्यांना ट्रोल केले जाते. सेलिब्रेटींना खरंतर अशा ट्रोलिंगचा अजिबात फरक पडत नाही. त्यामुळे फारसे त्यावर लक्ष न देता त्यांना जे आवडेल तेच करताना दिसतात. मात्र कधी कधी नेटीझन्स त्यांची हद्द पार करत सेलिब्रेंटींवर उगाच बोलत त्यांच्यावर निशाणा साधत असतात. त्यावेळी अशा ट्रोलर्सची वेळीच बोलती बंद करणेही गरजेचे असते त्यामुळे सेलिब्रेटी अनेकदा सडेतोड उत्तर देताना दिसतात. 

गेल्या काही दिवसांपासून शिखा सिंगलाही अशाच ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वीच शिखाने स्तनपान करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमुळे नेटीझन्सने लगेच तिला सुनवायला सुरुवात केली. शिखाने फोटो शेअर करत तिचे सकारात्मक विचारही मांडले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत फोटोमुळे नेटीझन्स राग व्यक्त करताना दिसले. 

याचा शिखालाही अजिबात फरक पडला नाही. त्यानंतर शिखाने तिचा एक टॉपलेस फोटो शेअर केला. हा फोटो पाहून पुन्हा एकदा तिला ट्रोल केले गेले. नको नको त्या कमेंट केल्या गेल्या. ''तुझ्याकडून अजून काय अपेक्षा करु शकतो'' अशा प्रकारच्या कमेंट्स तिच्या फोटोंवर दिल्या गेल्या. यावर शिखानेही अजूनपर्यंत प्रत्युत्तर दिलेले नाही. याउलट तिने नेटीझन्सना असा फोटो शेअर करत प्रत्युत्तरच दिले आहे. 


‘कुमकुम भाग्य’ मालिकेमुळे शिखा सिंगला घराघरात ओळख मिळाली. गेल्यावर्षी तिने मुलीला जन्म. मुलीला जास्त वेळ देता यावा याच कारणामुळे सध्या तिने  ब्रेक घेतला आहे. मालिकेत झळकत नसली तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच आपल्या मुलीसोबतचे कुटुंबियांसोबतचे 
 मजा मस्ती करतानाचे खास क्षणाचे फोटो व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते. 

Web Title: Fans expresses their dissatisfaction over topless photos shared by Kumkum Bhagya Actress Shikha Singh