'तारक मेहता..' फेम दयाबेनची अवस्था पाहून चाहते झाले हैराण, पतीमुळे दिशा वाकानीचं करिअर उद्ध्वस्त?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 19:14 IST2022-08-30T19:14:18+5:302022-08-30T19:14:44+5:30

Disha Vakani: गेल्या अनेक वर्षांपासून दया बेनची भूमिका साकारणारी दिशा वाकानी या मालिकेत दिसत नाही. चाहत्यांना तिची खूप आठवण येते आणि आशा आहे की ती लवकरच मालिकेत कमबॅक करेल.

Fans are shocked to see the condition of 'Tarak Mehta..' fame Dayaben, Disha Vakani's career ruined because of her husband? | 'तारक मेहता..' फेम दयाबेनची अवस्था पाहून चाहते झाले हैराण, पतीमुळे दिशा वाकानीचं करिअर उद्ध्वस्त?

'तारक मेहता..' फेम दयाबेनची अवस्था पाहून चाहते झाले हैराण, पतीमुळे दिशा वाकानीचं करिअर उद्ध्वस्त?

क्वचितच असे घर असेल जिथे तारक मेहता का उल्टा चष्मा (Tarak Mehta Ka Ulta Chashma) शो पाहिला नाही. ही मालिका खूप जुनी आहे आणि लोकांना ही मालिका खूप आवडते. गेल्या अनेक वर्षांपासून दया बेनची भूमिका साकारणारी दिशा वाकानी (Disha Vakani) या मालिकेत दिसत नाही. चाहत्यांना तिची खूप आठवण येते आणि आशा आहे की ती लवकरच मालिकेत कमबॅक करेल, पण त्याचवेळी लोकांना असा प्रश्नही पडतो की तिने मालिका का सोडली? दिशाने मालिका सोडण्याचे कारण तिचा नवरा असल्याचे बोलले जात आहे.

दिशा वाकानीला मालिका सोडून जवळपास पाच वर्षे झाली आहेत. पण तिचे चाहते अजूनही तिच्या परतण्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, अभिनेत्रीचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तिचे चाहते चांगलेच संतापले आहेत. वास्तविक तिच्या एका चाहत्याने तिचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती एका मुलासोबत दिसत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दिशाची प्रकृती खूपच वाईट दिसत आहे. यानंतर चाहत्यांनी तिच्या वाईट अवस्थेसाठी पतीला जबाबदार धरून संताप व्यक्त केला आहे.  


इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये दिशाला नो मेकअप लूकमध्ये ओळखणं कठीण आहे. याशिवाय तिचे वजनही पूर्वीच्या तुलनेत खूप वाढलेलं दिसून येत आहे. खरंतर तिला पाहून कोणीही म्हणू शकत नाही की, ती तारक मेहता का उल्टा चष्माची दयाबेन आहे. फोटो पाहून चाहते म्हणत आहेत की दिशाच्या वाईट अवस्थेला तिचा नवरा जबाबदार आहे आणि तिच्या पतीमुळेच तिची कारकीर्द उद्ध्वस्त झाली आहे. एका युजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं आहे की, तिच्या पतीने तिचं करिअर बर्बाद केलं. दुसर्‍या युजरने संताप व्यक्त करत लिहिलं की, अभिनेत्री पती आणि मुलामध्ये अडकून बसलीय.

Web Title: Fans are shocked to see the condition of 'Tarak Mehta..' fame Dayaben, Disha Vakani's career ruined because of her husband?