'श्रीमंतघरची सून' मालिकेत दिसणार सुप्रिया पाठारे, फाल्गुनी रजनीच्या भूमिकेत झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 20:00 IST2021-05-19T19:54:29+5:302021-05-19T20:00:40+5:30

श्रीमंताघरची सून मालिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.ही मालिका दिवसेंदिवस रंजक आणि रसिकांची लाडकी मालिका बनत चालली आहे. मालिकेतील कथानक दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होत आहे

Falguni Rajani bids adieu to Shrimanta Gharchi Suun; Supriya Pathare to replace her | 'श्रीमंतघरची सून' मालिकेत दिसणार सुप्रिया पाठारे, फाल्गुनी रजनीच्या भूमिकेत झळकणार

'श्रीमंतघरची सून' मालिकेत दिसणार सुप्रिया पाठारे, फाल्गुनी रजनीच्या भूमिकेत झळकणार

राज्यातील लॉकडाऊनमुळे अनेक मालिकांचे चित्रीकरण इतर राज्यांमध्ये होते आहे. सोनी मराठी वाहिनीवरील 'श्रीमंताघरची सून' या मालिकेचे चित्रीकरणही राज्याबाहेर सुरू झाले असून  मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांचा भेटीला आले आहेत. श्रीमंताघरची मुलगी, अनन्या जेव्हा मध्यमवर्गीय कर्णिक कुटुंबात सून होऊन आल्यावर काय घडते, हे या मालिकेतून प्रेक्षकांना दिसते आहे. या मालिकेत देविकाची भूमिका आता अभिनेत्री सुप्रिया पाठारे साकारणार आहेत. मराठी कलाविश्वात सुप्रिया पाठारे हे नाव प्रसिद्ध असून त्यांनी आत्तापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत.

श्रीमंताघरची सून मालिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.ही मालिका दिवसेंदिवस रंजक आणि रसिकांची लाडकी मालिका बनत चालली आहे. मालिकेतील कथानक दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होत आहे.सुप्रिया पाठारेच्या एंट्रीने मालिका आणखी रंजक होणार आहे. आपल्या विनोदी अंदाजाने सुप्रिया पाठारेनं रसिकांना पोट धरुन हसवण्यास भाग पाडलं. त्यामुळे आता ‘श्रीमंताघरची सून’  या मालिकेत सुप्रिया कशा प्रकारे रसिकांना खिळवून ठेवणार हे पाहणेही तितकेच रंजक असणार आहे. तुर्तास मालिकेत दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी आणि मालिकेचे कथानक रसिकांना भावते आहे.

सुप्रियाने याआधी विनोदी कार्यक्रम 'फु बाई फु', जागो मोहन प्यारे यांसारख्या लोकप्रिय मालिकेतून रसिकांचे भरघोस मनोरंजन केले आहे.मराठी मनोरंजन क्षेत्रात  विनोदसम्राज्ञी म्हणून सुप्रिया पाठारे ओळखली जाते.आपल्या विशिष्ट शैलीमुळे प्रसिद्ध असली विनोदाच्या क्षेत्रात पाय रोवण्यासाठी 16 वर्षांचा खडतर प्रवास करावा लागल्याचे एका मुलाखतीत सांगितले होते. सुप्रिया पाठारेने टीवी  मालिकाव्यतिरिक्त सिनेमातही काम केले आहे. सुपारी बायकोची , फक्त लढ म्हणा , करु या कायद्याची बात , बालक पालक , टाइमपास , टाइमपास , चि. व चि. सौ. का  या सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 

Web Title: Falguni Rajani bids adieu to Shrimanta Gharchi Suun; Supriya Pathare to replace her