'अबीर गुलाल' मालिकेत रोमांचक वळण, श्रीचा जीव जडलाय अगस्त्यवर; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 18:02 IST2024-08-01T18:01:51+5:302024-08-01T18:02:31+5:30

Abeer Gulal Serial : 'अबीर गुलाल' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. मालिकेतील श्री, शुभ्रा आणि अगस्त्य हे त्रिकूट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आता मालिकेत एक वेगळाच ट्विस्ट आला आहे.

Exciting twist in 'Abeer Gulal' serial, Shree loves Agastya; But... | 'अबीर गुलाल' मालिकेत रोमांचक वळण, श्रीचा जीव जडलाय अगस्त्यवर; पण...

'अबीर गुलाल' मालिकेत रोमांचक वळण, श्रीचा जीव जडलाय अगस्त्यवर; पण...

कलर्स मराठी वाहिनीवरील 'अबीर गुलाल' (Abeer Gulal Serial) ही मालिका अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. मालिकेतील श्री, शुभ्रा आणि अगस्त्य हे त्रिकूट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आता मालिकेत एक वेगळाच ट्विस्ट आला आहे. मालिकेत शुभ्रा अगस्त्यच्या प्रेमात वेडी झाली आहे. अगस्त्यचं मन जिंकण्यासाठी ती वेगवेगळे प्रयत्न करताना दिसत आहे. तर दुसरीकडे श्रीला आता सर्वत्र अगस्त्यचा भास होत आहे. श्रीचे विश्व अगस्तच्या भोवताली फिरत असताना अगस्त्य मात्र याबाबत अनभिज्ञ आहे.

अगस्त्य हा निंबाळकर घराण्याचा मुलगा असून सुलक्षणा निंबाळकरांनी त्याच्या लग्नाचा घाट घातला आहे. शुभ्रा आपल्या घराची सून व्हावी अशी अगस्त्यच्या आईची इच्छा आहे. तर शुभ्राने एक पाऊल पुढे येत अगस्त्यला लग्नासाठी प्रपोज केले आहे.पण अगस्त्यने मात्र शुभ्राच्या प्रपोजला रिजेक्ट केलेले पाहायला मिळाले आहे. 


दुसरीकडे, श्रीच्या अगस्त्यबद्दलच्या मैत्रीचे रुपांतर आता प्रेमात होऊ लागले आहे. श्रीला सर्वत्र अगस्त्यचा भास होऊ लागला आहे. एकंदरीतच तिचा जीव अगस्त्यमध्ये दडलेला आहे. याआधी अगस्त्य आणि श्रीमधले गोड क्षण प्रेक्षकांना मालिकेत आणि प्रोमोमध्ये पाहायला मिळाले आहेत.श्री अगस्त्यला आपल्या प्रेमाची कबुली देणार का? अगस्त्य श्रीला आपलं सत्य सांगणार का? एका रात्रीत श्रीचं आयुष्य बदलणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना मालिकाच पाहावी लागेल. 
 

Web Title: Exciting twist in 'Abeer Gulal' serial, Shree loves Agastya; But...