एरिका फर्नांडिस 'गेम ऑफ थ्रोन्स'ची कट्टर चाहती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 20:00 IST2019-04-21T20:00:00+5:302019-04-21T20:00:00+5:30

'कसौटी जिंदगी के' मालिकेतील कणखर आणि स्वतंत्र मनाच्या प्रेरणा शर्माची भूमिका साकारीत असल्याबद्दल अभिनेत्री एरिका फर्नांडिसची सार्वत्रिक प्रशंसा होत आहे.

Erica Fernandes is a die-hard fan of Game of Thrones | एरिका फर्नांडिस 'गेम ऑफ थ्रोन्स'ची कट्टर चाहती

एरिका फर्नांडिस 'गेम ऑफ थ्रोन्स'ची कट्टर चाहती

स्टार प्लसवरील 'कसौटी जिंदगी के' मालिकेतील कणखर आणि स्वतंत्र मनाच्या प्रेरणा शर्माची भूमिका साकारीत असल्याबद्दल अभिनेत्री एरिका फर्नांडिसची सार्वत्रिक प्रशंसा होत आहे. सध्या 'गेम ऑफ थ्रोन्स' या मालिकेची लोकप्रियताही भरपूर वाढली असून या मालिकेच्या चाहत्यांमध्ये अनेक सेलिब्रिटींचाही समावेश आहे. आता या सेलिब्रिटी चाहत्यांच्या नामावळीत एरिका फर्नांडिसचेही नाव समाविष्ट झाले आहे; कारण तिने अलीकडेच आपण या मालिकेचे कट्टर चाहते असल्याचे सांगितले.

एरिकाने नुकतेच या मालिकेतील प्रसिद्ध तलवारबद्ध सिंहासनावर बसलेले आपले एक छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले होते. या अभिनेत्रीशी निकटचे संबंध असलेल्या एका सूत्राने सांगितले, 'या मालिकेच्या नव्या आवृत्तीची एरिका फर्नांडिस धीराने वाट पाहात होती आणि जेव्हा ही नवी आवृत्ती प्रसारित झाली, तेव्हा त्यातील तलवारींच्या सिंहासनावर
बसलेल्या स्थितीतील आपले छायाचित्र सोशल मीडियावर शेअर करून एरिकाने आपला आनंद व्यक्त केला. या मालिकेची तसेच तिच्याशी संबंधित पुस्तकाची एरिका ही फार मोठी चाहती असून आता तब्बल दोन वर्षांनंतर या मालिकेच्या नव्या आवृत्तीची तिची प्रतीक्षा संपुष्टात आल्याने तिला प्रचंड आनंद झाला आहे. एरिकाचे या प्रसिद्ध सिंहासनावर बसलेले
छायाचित्र पाहून तिचे चाहतेही खुश झाले असून त्यांनी तिच्यावर शुभेच्छा आणि प्रेमाचा वर्षाव केला आहे.'


एरिकाने अलीकडेच आपल्याला योद्धा राजकन्येची भूमिका साकारावयास आवडेल, अशी इच्छा व्यक्त केली होती आणि आताचे हे सिंहासनारूढ छायाचित्र तिच्या या अपेक्षित भूमिकेची झलक म्हणावी लागेल. 

स्टार प्लसवरील 'कसौटी जिंदगी के' मालिकेतील कणखर आणि स्वतंत्र मनाच्या प्रेरणा शर्माची भूमिका साकारीत असल्याबद्दल अभिनेत्री एरिका फर्नांडिसची सार्वत्रिक प्रशंसा होत आहे.

Web Title: Erica Fernandes is a die-hard fan of Game of Thrones