बिग बॉस मराठी सिझन २ : आणि घरातील सदस्यांची आज होणार तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 13:14 IST2019-07-02T12:58:13+5:302019-07-02T13:14:41+5:30

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी टास्क वीणा आणि माधवमध्ये पार पडला. ज्यामध्ये माधवने बाजी मारून घराचा नवा कॅप्टन होण्याचा मान पटकवला.

Emergency alert in today's bigg boss house | बिग बॉस मराठी सिझन २ : आणि घरातील सदस्यांची आज होणार तारांबळ

बिग बॉस मराठी सिझन २ : आणि घरातील सदस्यांची आज होणार तारांबळ

ठळक मुद्देआता या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाणार ?

 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी टास्क वीणा आणि माधवमध्ये पार पडला. ज्यामध्ये माधवने बाजी मारून घराचा नवा कॅप्टन होण्याचा मान पटकवला. तसेच काल घरामध्ये नॉमिनेशन कार्य देखील पार पडले. ज्यामध्ये किशोरी शहाणे, सुरेखा पुणेकर, हिना पांचाळ, वैशाली माडे आणि रुपाली भोसले नॉमिनेट झाले. आता या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाणार ? कोणाला प्रेक्षकांची मतं वाचवणार ? हे बघणे रंजक असणार आहे.

हीना आणि शिवमध्ये बरेच वाद होत असतात. मग ते वीणा वरून असो वा टास्क दरम्यान असो... आज देखील हीना आणि शिवमध्ये वादाची ठिणगी उडणार आहे. ग्रुपमधील सदस्य एकत्र बसले असताना वैशाली, शिव आणि अभिजीत यांच्यामध्ये गप्पा सुरु होत्या आणि ते एकमेकांची मज्जा करत होते. हीना अभिजीतला हाताला लागल्यामुळे क्रेप बँडेज लावत होती. तर वैशाली शिवला अभिजीत वरून म्हणाली, "नात्यांमध्ये तो गल्लत करत नाही" त्यावर अभिजीत देखील म्हणाला अगदीच खरं आहे. आणि शिवने यावरून अभिजीतला चिडवायला सुरुवात केली. पण कुठेतरी हीनला या गोष्टीचा राग आला आणि ती शिववर भडकली. हीनाने शिवला खडसावून सांगितले, पुन्हा असं बोलास तर मी खूप घाणेरड्या शब्दांत उत्तर देणार.'' यावर शिवदेखील तिला म्हणाला तुझ्याशी गंमत नाही केली का मी, माझ्याशी असं बोलायचं नाही." शिव इथेच थांबला नाही तो पुढे म्हणाला, तुला गोष्टी नाही कळत तर मला विचार." शिव असं काय म्हणाला ज्यावरून हीना त्याच्यावर इतकी चिडली ? आता हे भांडण किती विकोपाला जाणार, कोण नमतं घेणार हे कळेल आजच्या भागामध्ये. 

बिग बॉसच्या घरामध्ये आज सगळ्या सदस्यांची घाबरगुंडी उडाली आहे... कारण अचानक घरामध्ये सायरन वाजला आणि घरातील लाइट्स जाणार असे वाटत असताना बिग बॉस यांनी घोषणा केली, "मुसळधार पावसामुळे आपातकालीन परिस्थिती उद्भवली आली आहे"

Web Title: Emergency alert in today's bigg boss house