'कसौटी जिंदगी की 2'च्या स्क्रीनिंगला एकता कपूर अनुपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 03:43 PM2018-09-27T15:43:53+5:302018-09-27T15:45:46+5:30

स्टार प्लसवरील नवीन मालिका 'कसौटी जिंदगी की 2'च्या निर्मात्यांनी नुकतेच ह्या मालिकेचे चाहते आणि प्रेक्षक यांच्यासोबत शहरात या मालिकेच्या पहिल्या भागाच्या स्क्रीनिंगचे आयोजन केले होते.

Ekta Kapoor absent from screening of 'Kasoti Zindagi Ki 2' | 'कसौटी जिंदगी की 2'च्या स्क्रीनिंगला एकता कपूर अनुपस्थित

'कसौटी जिंदगी की 2'च्या स्क्रीनिंगला एकता कपूर अनुपस्थित

googlenewsNext
ठळक मुद्दे'कसौटी जिंदगी की 2' मालिका आली प्रेक्षकांच्या भेटीला

स्टार प्लसवरील नवीन मालिका 'कसौटी जिंदगी की 2'च्या निर्मात्यांनी नुकतेच ह्या मालिकेचे चाहते आणि प्रेक्षक यांच्यासोबत शहरात या मालिकेच्या पहिल्या भागाच्या स्क्रीनिंगचे आयोजन केले होते. यावेळी टीव्ही इंडस्ट्रीतील सिताऱ्यांनीही उपस्थिती लावली होती.


या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञांसोबत करण पटेल, अदा खान, करिष्मा तन्ना, दलजित कौर, क्रिस्टल डिसुझा, उर्वशी ढोलाकिया ही कलाकार मंडळी उपस्थित होते. मात्र, मालिकेच्या निर्मात्या एकता कपूर या स्क्रीनिंगसाठी उपस्थित नव्हत्या. निर्मात्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले, कसौटी जिंदगी की हा एकताचा सर्वांत आवडता प्रोजेक्ट असून तिला आशा आहे प्रेक्षक या मालिकेच्या पहिल्या सीझनप्रमाणेच या सीझनलाही तेवढेच प्रेम देतील आणि त्याला स्वीकारतील. तिच्या एवढ्‌या आवडत्या मालिकेच्या लाँच स्क्रीनिंगला ती हजर नव्हती. पण आपली अनुपस्थिती तिने जाणवू दिली नाही. स्क्रीनिंगनंतर तिने व्हिडीओ कॉल केला आणि ह्या मालिकेच्या सुरूवातीबद्दल आनंद व्यक्त केला. तिने आपल्या कलाकारांचे आणि तंत्रज्ञांचे आभार मानले आणि इंडस्ट्रीमधील आपल्या मित्रांसमोर स्क्रीनिंगला आल्याबद्दल आणि ह्या संध्येला संस्मरणीय बनवण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 
एकता कपूरने आपल्या टेलिव्हिजनवर एक से एक शोज्‌ दिले असून आपल्या कथांसह तिने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. आपल्या शोच्या सुरूवातीच्या वेळेस ती काहीही कसर बाकी सोडत नाही हे तिने पुन्हा एकदा दाखवून दिले. 'कसौटी जिंदगी की 2' मालिका दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजता फक्त स्टार प्लसवर प्रसारीत होणार आहे.

Web Title: Ekta Kapoor absent from screening of 'Kasoti Zindagi Ki 2'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.