ईशा सिंगचा ढसढसा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल; चाहत्यांमध्ये चिंता, अखेर दिलं स्पष्टीकरण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 09:24 IST2025-08-05T09:22:59+5:302025-08-05T09:24:28+5:30

ईशा सिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Eisha Singh Crying Nosebleed Video Viral Upcoming Song Reveal | ईशा सिंगचा ढसढसा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल; चाहत्यांमध्ये चिंता, अखेर दिलं स्पष्टीकरण!

ईशा सिंगचा ढसढसा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल; चाहत्यांमध्ये चिंता, अखेर दिलं स्पष्टीकरण!

Eisha Singh Crying: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉस फेम ईशा सिंगचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडीओ तिच्या कोणत्याही ग्लॅमरस लूकचा किंवा प्रमोशनल फोटोशूटचा भाग नसून, तिच्या चाहत्यांना काळजीत टाकणारा आहे. 

ईशा सिंगने स्वतः हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती जोरजोराने रडताना दिसत आहे आणि तिच्या चेहऱ्यावर अश्रूंसोबत नाकातून रक्तही वाहताना दिसतेय. आहे. हे दृश्य पाहूनतिचे अनेक चाहते घाबरले. अनेकांनी ईशाची तब्येत ठीक आहे का, याबद्दल विचारणा केली. अखेर ईशाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे या व्हिडीओमागील खरी माहिती शेअर करत सर्वांची चिंता दूर केली. तिनं लिहलं, "हा व्हिडीओ माझ्या आगामी गाण्याचा भाग आहे. हे दृश्य त्या गाण्याच्या भावनिक क्षणाचे प्रतिनिधित्व करणार आहे. माझा उद्देश कोणालाही घाबरवण्याचा नव्हता".



टीव्ही विश्वात ईशाची दमदार कारकीर्द
ईशा सिंगने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 'इश्क का रंग सफेद' या मालिकेतून केली होती. या मालिकेमधील तिची साधी पण प्रभावी भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. त्यानंतर तिने 'एक था राजा एक थी रानी', 'इश्क सुभान अल्लाह' आणि 'सिरफिरा इश्क' यांसारख्या मालिकांमध्ये देखील तिच्या अभिनयाची छाप पाडली. याव्यतिरिक्त, ईशा सिंगने 'बिग बॉस १८'मध्ये सहभाग घेतला होता. 


 

Web Title: Eisha Singh Crying Nosebleed Video Viral Upcoming Song Reveal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.