प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देतेय Cervical Cancerशी झुंज, पूनम पांडेच्या 'स्टंट'वर भडकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 14:33 IST2024-02-04T14:30:57+5:302024-02-04T14:33:16+5:30
आधी पूनमच्या मृत्यूची बातमी ऐकून तिलाही धक्का बसला होता. खरं कळल्यावर अभिनेत्रीला झाला राग अनावर

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देतेय Cervical Cancerशी झुंज, पूनम पांडेच्या 'स्टंट'वर भडकली
पूनम पांडेने (Poonam Pandey) स्वत:च्याच मृत्यूचा खोटा स्टंट केल्याने सर्वजण तिच्यावर भडकले आहेत. 'सर्व्हायरल कॅन्सर'(Cervical Cancer) बाबत जनजागृती पसरवण्यासाठी तिने हे नाटक केलं. यामुळे संपूर्ण सिनेसृष्टी तिला खडेबोल सुनावत आहे. इतकंच नाही तर तिच्यावर कारवाई व्हावी अशीही मागणी होत आहे. खरोखर कॅन्सर असलेल्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पूनमने भावना दुखावल्याचीही प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जी स्वत: सर्व्हायकल कॅन्सरशी झुंज देत आहे तिनेही पूनम पांडेच्या या 'सो कॉल्ड जनजागृती'वर प्रतिक्रिया दिली आहे.
लोकप्रिय हिंदी मालिका 'झनक' मध्ये सृष्टी मुखर्जी ही मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री डॉली सोही (Dolly Sohi)सध्या चर्चेत आहे. डॉलीला गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सर्व्हायकल कॅन्सरचे निदान झाले. डॉली म्हणाली, "काही महिन्यांपूर्वी मला या कॅन्सरचे निदान झाले. माझी किमोथेरपी पूर्ण झाली आहे आणि रेडिएशन सुरु आहे. सध्या मी माझ्या आरोग्याकडे लक्ष देत आहे. याचकारणाने मी झनक मालिकाही सोडली. प्रोडक्शन हाऊसनेही माझ्या निर्णयानंतर माझं समर्थन केलं. आता मी पूर्ण बरी होऊनच कामावर परत येईन."
पूनम पांडेच्या 'स्टंट'वर डॉली भडकली
पूनम पांडेच्या स्टंटवर डॉली म्हणाली, " स्वत:च्या मृत्यूची अफवा पसरवली. ज्या महिलाआधीच या गंभीर आजाराचा सामना करत आहेत, मोठ्या वेदनेतून जात आहेत त्यांच्या भावना दुखावल्या.पूनम तुला खरंच लाज वाटली पाहिजे. मी सध्या खूप भावूक आहे. पूनमसारखे लोक ज्यांनी सर्व्हायकल कॅन्सरची अशी खिल्ली उडवली आहे. हे पाहून मला कोणत्याही क्षणी रडू येईल. पब्लिसिटी किंवा कॅम्पेनचा हा योग्य पर्याय नाही. जेव्हा मी पूनमच्या मृत्यूची बातमी वाचली होती तेव्हा मला धक्का बसला होता."
वर्कफ्रंट
'झलक' मालिकेशिवाय डॉलीने आतापर्यंत अनेक डेली सोपमध्ये काम केले आहे. 'कलश','देवो के देव महादेव','झाँसी की रानी','मेरी आशिकी तुमसे ही','एक था राजा एक थी रानी' यासह अनेक मालिकांचा समावेश आहे. बऱ्याच काळापासून डॉली टेलिव्हिजन विश्वात काम करत आहे.