तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील माधवी भिडे म्हणजेच सोनालिका जोशीच्या खऱ्या कुटुंबाचे फोटो तुम्ही पाहिले का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 15:35 IST2018-06-05T10:05:19+5:302018-06-05T15:35:19+5:30
तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या ...

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील माधवी भिडे म्हणजेच सोनालिका जोशीच्या खऱ्या कुटुंबाचे फोटो तुम्ही पाहिले का?
त रक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, मिस्टर हाथी, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या मालिकेला आज आठ वर्षांहून अधिक वर्षं झाले असले तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये. ही मालिका प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन करत आहे. टिआरपीच्या रेसमध्ये तर ही मालिका नेहमीच अव्वल राहिली आहे.
या मालिकेत गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्मराम भिडे आणि त्यांची पत्नी माधवी भिडे यांची जोडी तर प्रेक्षकांना खूप आवडते. त्यांचे मराठी बोलणे तर प्रेक्षकांना खूप भावते. या मालिकेत मंदार चांदवलकर आत्माराम भिडेची तर सोनालिका जोशी माधवी भिडेची भूमिका साकारते.
सोनालिका जोशीचा आज वाढदिवस असून तिच्याविषयी काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सोनालिका ही एक मराठी मुलगी असून तिने मराठी रंगभूमीपासूनच आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने तिच्या कारकिर्दीला एक वेगळेच वळण मिळवून दिले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. कारण आज प्रेक्षक सोनालिकाला माधवी याच नावाने ओळखू लागले आहेत. या मालिकेत तिला एक मुलगी असल्याचे दाखवण्यात आले आहे. खऱ्या आयुष्यात देखील तिला मुलगी असून तिच्या पती आणि मुलीसमवेत ती मुंबईत राहाते. सोनालिका ही खूपच चांगली अभिनेत्री असण्यासोबतच एक लेखिका देखील आहे. तिला लिखाण करायला खूपच आवडते.
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील गोकुळधाम सोसायटीतील सगळे सदस्य हे एखाद्या कुटुंबियांसारखे असल्याचे मालिकेत दाखवण्यात आले आहे. खऱ्या आयुष्यात देखील ही मंडळी एखाद्या कुटुंबियांसारखी असून ते अनेकवेळा एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात. एवढेच नव्हे तर त्यांच्या सगळ्यांची कुटुंबं देखील त्यांच्यासोबत असतात.
![sonalika joshi husband]()
![sonalika joshi daughter]()
Also Read : पहिल्यांदाच 'दया भाभी'च्या लेकीचा फोटो आला समोर,बघा फोटो