फोटोतील या दोन बहिणींना ओळखलंत का?, मराठी टेलिव्हिजनवर करतायेत राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 12:24 IST2022-09-06T12:24:17+5:302022-09-06T12:24:47+5:30

या बहिणींमध्ये खूप छान बॉण्डिंग असून त्या दोघी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.

Do you recognize these two sisters in the photo?, they are famous actress of marathi television | फोटोतील या दोन बहिणींना ओळखलंत का?, मराठी टेलिव्हिजनवर करतायेत राज्य

फोटोतील या दोन बहिणींना ओळखलंत का?, मराठी टेलिव्हिजनवर करतायेत राज्य

मराठी टेलिव्हिजनवरील अभिनेत्री तितिक्षा तावडे (Titeeksha Tawde) आणि अभिनेत्री खुशबू तावडे (Khushaboo Tawde) या बहिणी आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. या दोघी बहिणींमध्ये खूप छान बॉण्डिंग आहे. त्या दोघी सोशल मीडियावर सक्रीय असून त्या फोटो शेअर करत असतात. सध्या खुशबू आपल्या पहिल्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. सोबतच तितिक्षासुद्धा मावशी असल्याचा पुरेपूर आनंद घेत आहे. आज खुशबूचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने तितिक्षाने बहिणींसाठी स्पेशल पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

तितिक्षा तावडे हिने इंस्टाग्रामवर खुशबूसोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, इतकी वर्षे एकत्र राहिली आणि तरीही तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. निर्भय, शांत आणि स्वप्नाळू असल्याबद्दल धन्यवाद. तुज्या आजूबाजूला आयुष्य खूप सोपे आणि आनंदी झाले आहे. अकल्पनीय वाटणारी स्वप्ने पाहून तू कशी आश्चर्यचकित करते हे पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. तुला तुझी स्वप्ने पूर्ण करताना पाहणे हा मला आवडणारा सर्वोत्तम शो आहे. असेच सुरू ठेव ! तू स्टार आहेस. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.


'सरस्वती' मालिकेतून तितिक्षा तावडेने रसिकांची मनं जिंकली तर खुशबू तावडेनेही विविध मालिका आणि नाटकांतून रसिकांचे मनोरंजन केले आहे.

Web Title: Do you recognize these two sisters in the photo?, they are famous actress of marathi television