फोटोतील अभिनेत्याला ओळखलंत का? 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून पोहचलाय घराघरात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 03:09 PM2024-02-19T15:09:33+5:302024-02-19T15:12:04+5:30

अभिनेत्याचा स्त्री वेशातील लूक होतोय व्हायरल

Do you recognize the actor in the photo? The 'Maharashtra Laughter Fair' has reached the homes from the show | फोटोतील अभिनेत्याला ओळखलंत का? 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून पोहचलाय घराघरात

फोटोतील अभिनेत्याला ओळखलंत का? 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून पोहचलाय घराघरात

महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) शोने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. हा शो अगदी आवडीने पाहिला जातो. या शोमधून अनेक नवोदित कलाकारांनाही प्रसिद्धी मिळाली. यातूनच अभिनेता पृथ्विक प्रताप(Prithvik Pratap)ही प्रसिद्धीझोतात आला. अभिनय आणि विनोदाची सांगड घालत पृथ्विक प्रेक्षकांना खळखळवून हसवतो. या शोनंतर त्याची फॅन फॉलोव्हिंग खूप आहे. तो सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना अपडेट देत असतो. दरम्यान आता अभिनेत्याने इंस्टाग्रामवर स्त्री वेशातील फोटो शेअर केला आहे, त्याचा हा फोटो व्हायरल होतो आहे.

अभिनेता पृथ्वीक प्रतापने स्त्री वेशातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्याने फोटो शेअर करत लिहिले की, देवयानी…पसंत आहे मुलगी. त्याच्या या स्त्री वेशातील लूकला चाहत्यांची पसंती मिळते आहे.

चाहत्यांनी फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने लिहिले की, लयच खतरनाक एकदम, दुसऱ्याने म्हटले की, पृथ्वीक मी तुझ्या प्रेमात पडलो.आणखी एकाने लिहिले की, निखळ सौंदर्य. चाहत्यांसोबत सेलिब्रेटींनीही कमेंट केल्या आहेत. 

वर्कफ्रंट
पृथ्विकचा काही दिवसांपूर्वी ‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेता प्रथमेश परब होता. या आधी त्याने काही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'क्लास ऑफ ८३' या हिंदी सिनेमातही पृथ्विक झळकला होता. सध्या तो महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहे.  

Web Title: Do you recognize the actor in the photo? The 'Maharashtra Laughter Fair' has reached the homes from the show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.