कॅमेऱ्याकडे बघून क्युट स्माईल देणाऱ्या या मुलीला ओळखलंत का? आज मराठी इंडस्ट्रीवर गाजवतेय राज्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 06:05 PM2023-11-16T18:05:26+5:302023-11-16T18:06:17+5:30

फोटोत कॅमेऱ्याकडे बघून क्युट स्माईल देणारी ही मुलगी आज मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

Do you know this girl? today she is a famous face in Marathi industry | कॅमेऱ्याकडे बघून क्युट स्माईल देणाऱ्या या मुलीला ओळखलंत का? आज मराठी इंडस्ट्रीवर गाजवतेय राज्य

कॅमेऱ्याकडे बघून क्युट स्माईल देणाऱ्या या मुलीला ओळखलंत का? आज मराठी इंडस्ट्रीवर गाजवतेय राज्य

सध्या सोशल मीडियावर बालपणीच्या फोटोंचा ट्रेंड पाहायला मिळतो. या ट्रेंडमध्ये सेलिब्रेटी मंडळीदेखील सामील झाले आहेत. बॉलिवूड असो किंवा मराठी सिनेइंडस्ट्री, सेलिब्रेटींनी देखील त्यांच्या बालपणींचे फोटो शेअर करताना दिसतात आणि आपल्या आठवणींना उजाळा देताना दिसतात. दरम्यान मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा बालपणीचा सोशल मीडियावर व्हायरल होतोय. फोटोत कॅमेऱ्याकडे बघून  क्युट स्माईल देणारी ही मुलगी आज मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

ही मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून श्रेया बुगडे आहे. श्रेया सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. श्रेया बुगडे तिच्या इन्स्टा अकाऊंटवर नेहमीच स्वत: आणि कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते. श्रेयाने तिच्या लहानपणीचे अनेक फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत त्यापैकी हा एक आहे. स्वतःचे अनेक ग्लॅमरस फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. याशिवाय अनेक ट्रेंडिंग रिल्सही ती चाहत्यांसोबत शेअर करताना पाहायला मिळते.

कॉमेडीचं अचूक टायमिंग आणि आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आज अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugde) घराघरात लोकप्रिय झाली आहे. चला हवा येऊ द्या(Chala Hawa Yeu Dya)नं श्रेयाला फक्त ओळखचं मिळवून दिलेली नाही तर तिला प्रसिद्धीच्या शिखरावर देखील पोहचवले आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्ग फक्त भारतातच नाही तर जगभरात आहे.  


 

Web Title: Do you know this girl? today she is a famous face in Marathi industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.