शंशाक खेतानचे हे टॅलेंट तुम्हाला माहिती आहे का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 17:10 IST2018-08-23T17:01:56+5:302018-08-23T17:10:36+5:30

 डान्स दिवानेवर भाऊ व बहि‍णींमधील सुंदर नाते साजरे केले जाणार आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव त्यांच्या आगामी सिनेमा स्त्रीच्या प्रमोशन साठी येणार आहेत

Do you know this talent of Shankha Khetan? | शंशाक खेतानचे हे टॅलेंट तुम्हाला माहिती आहे का ?

शंशाक खेतानचे हे टॅलेंट तुम्हाला माहिती आहे का ?

ठळक मुद्दे 31 ऑगस्टला श्रद्धा आणि राजकुमार राव प्रेक्षकांना घाबरवायला आणि हसावायला येणार आहे

 डान्स दिवानेवर भाऊ व बहि‍णींमधील सुंदर नाते साजरे केले जाणार आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव त्याच्या आगामी सिनेमा; स्त्रीच्या प्रमोशन साठी येणार आहेत. शशांक खेतान अनेक गाणी गुणगुणत असतो, पण यावेळी मात्र त्यांचे गाण्याचे कौशल्य श्रध्दा कपूरच्या नजरेतून निसटू शकले नाही. साथिया तूने क्या किया हे गाणे त्यांनी गायले आणि त्यावर राजकुमार राव सुध्दा स्वतःला थांबवू शकले नाहीत आणि या जोडीने एकत्र गायला सुरूवात केली आणि त्यांना सेटवरील सर्वांनी प्रोत्साहन दिले. सेटवरील मूड पाहून आणि सेलिब्रिटी शशांकला पाठिंबा दिला. श्रद्धा कपूर म्हणाली “शशांकचे गायन कौशल्य पाहून मी चकित झाले, एक यशस्वी दिग्दर्शक असूनही तो नक्कल करण्यात तरबेज आहे ज्याची आपण कधी अपेक्षा केली नाही.”

श्रद्धा आणि राजकुमार राव यांच्या जोडीच्या स्त्रीमध्ये श्रद्धा भूताच्या भूमिकेत दिसले तर राजकुमार राव पीडित ट्रेलरच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्यांदाच राजकुमार श्रद्धासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.  सिनेमाचे लेखन राज आणि डिकेने केले आहे. सिनेमाची निर्मिती डिनेश विजन, राज आणि डीके करणार आहेत. राज आणि डिके यांनी शोर इन द सिटी, गो गोआ गॉन आणि हॅप्पी एंडिंग सारख्या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. 31 ऑगस्टला श्रद्धा आणि राजकुमार राव प्रेक्षकांना घाबरवायला आणि हसावायला येणार आहेत.  
 

Web Title: Do you know this talent of Shankha Khetan?