​स्मृती इराणी यांचे पती झुबिन इराणी यांची पत्नी बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध व्यक्ती आहेत हे तुम्हाला माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2017 12:09 IST2017-05-09T06:39:18+5:302017-05-09T12:09:18+5:30

स्मृती इराणी यांनी कविता या मालिकेपासून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेतनंतर त्या कुछ दिल से, क्या हादसा क्या ...

Do you know that Smriti Irani's wife Zubin Irani's wife is a famous person in the Bollywood industry? | ​स्मृती इराणी यांचे पती झुबिन इराणी यांची पत्नी बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध व्यक्ती आहेत हे तुम्हाला माहीत आहे का?

​स्मृती इराणी यांचे पती झुबिन इराणी यांची पत्नी बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध व्यक्ती आहेत हे तुम्हाला माहीत आहे का?

मृती इराणी यांनी कविता या मालिकेपासून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेतनंतर त्या कुछ दिल से, क्या हादसा क्या हकिगत यांसारख्या मालिकेमध्ये झळकल्या. पण खऱ्या अर्थाने क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेद्वारे त्यांना लोकप्रियता मिळाली. या मालिकेत त्यांनी साकारलेली तुलसी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूपच आवडली होती. 
स्मृती यांनी क्योंकी साँस भी कभी बहू थी ही मालिका सुरू असताना झुबिन इराणी यांच्याशी लग्न केले. झुबिन आणि स्मृती हे एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते. स्मृतीसोबत लग्न करण्याआधी झुबिनचे मोना इराणी यांच्याशी लग्न झालेले होते आणि त्यांना एक मुलगीदेखील होती.
झुबिन यांची पहिली पत्नी मोना आणि स्मृती या खऱ्या आयुष्यात खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. मोनाने झुबिनला घटस्फोट दिल्यानंतर स्मृती यांनी झुबिन यांच्याशी विवाह केला. आज लग्नानंतरही मोना आणि स्मृती यांची मैत्री टिकून आहे.
मोना या देखील इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. मोना या प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर असून त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांसाठी काम केले आहे. स्मृती इराणी यांचे उगराया नावाचे एक प्रोडक्शन हाऊस आहे. पण गेल्या काही वर्षांपासून त्या राजकारणात व्यग्र असल्याने त्यांना त्याच्या प्रोडक्शन हाऊसला वेळ देता येत नाही. त्यामुळे काही वर्षांपासून मोना हे प्रोडक्शन हाऊस सांभाळत आहे. याविषयी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोना यांनी सांगितले होते की, झुबिन आणि स्मृती सतत कुठे ना कुठे कामानिमित्त फिरत असल्याने प्रोडक्शन हाऊसला वेळ देणे त्यांना जमत नाही. आम्ही अनेक वर्षांपासून चांगले फ्रेंड्स असल्याने मी त्यांना मदत करत आहे.

mona irani

Web Title: Do you know that Smriti Irani's wife Zubin Irani's wife is a famous person in the Bollywood industry?