मला आर्यनला टेड टॉक देताना पाहायचे आहे,शाहरूखची इच्छा होणार का पूर्ण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 12:52 IST2017-11-30T07:22:18+5:302017-11-30T12:52:18+5:30
बॉलिवूडचा किंग खान शाहरूख वेळोवेळी आपल्या मुलांवर त्याचे किती प्रेम आहे हे वेळोवेळी समोर येते.मग सुहाना खान असो किंवा ...

मला आर्यनला टेड टॉक देताना पाहायचे आहे,शाहरूखची इच्छा होणार का पूर्ण?
ब लिवूडचा किंग खान शाहरूख वेळोवेळी आपल्या मुलांवर त्याचे किती प्रेम आहे हे वेळोवेळी समोर येते.मग सुहाना खान असो किंवा मग आर्यन असो किंवा अबराम तिन्ही मुलांबरोबर त्यांच खूप चांगले बॉन्डींग आहे. मुलांसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंड करतानाचे त्याचे सगळे फोटो त्यांच्या खास बॉन्डींगचे प्रचिती देत असतात.तसे शाहरूखची तिन्ही मुलं वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात.कधी सुहाना तिच्या महागड्या ड्रेसिंगमुळे तर कधी आर्यन त्याच्या बॉलिवूड डेब्युमुळे. आता पुन्हा एकदा शाहरूखचा मुलगा आर्यन चर्चेत आला आहे.कारण,शाहरूखने पुन्हा पुन्हा आपल्या मुलांवरील प्रेम जाहीरपणे व्यक्त केले आहे.यावेळेस आपला मोठा मुलगा आर्यनला भविष्यात टेड टॉक देताना पाहायची आपली इच्छा असल्याचे त्याने म्हटले आहे.किंग खान हा टेड टॉक्सचा चाहता असून ह्यावर्षीच्या सुरूवातील व्हॅनकूव्हरमध्ये टेड टॉक देण्याची आपली इच्छा त्याने पूर्ण केली. तो म्हणाला, “कधीतरी आर्यनला टेड टॉक देताना पाहायला मला आवडेल.”शाहरूख सध्या टेड टॉक्स इंडिया नयी सोच या आपल्या आगामी शोच्या तयारीत असून हा शो १० डिसेंबरपासून संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे.'टेड टॉक्स इंडिया नयी सोच' आणि एसआरके हे भारतीय प्रेक्षकांची मानसिकता बदलणारा चांगला मिलाफ आहे. अधिक चांगल्या भविष्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनातील कल्पनांकडे हा शो वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिला जातो. आपल्या वीकेन्ड्सना काही यशस्वी इनोव्हेटर्स आणि वक्ते आणि सोबत एसआरके प्रत्येक विषयाबद्दल मोठी तयारी करत आहेत.आता एसआरकेचा टॉक ऐकल्यानंतर ज्यूनिअर एसआरकेलाही टॉक देताना पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.बॉलिवूड डेब्युपूर्वीच आर्यन छोट्या पडद्यावर झळकणार आहे.
Also Read:आमिर खानचा 'सत्यमेव जयते सिझन 3' लवकरच रसिकांच्या भेटीला,तर शाहरूखचाही हा शो करणार रसिकांचे मनोरंजन
छोट्या पडद्यावर एट्री बरोबरच आता पुन्हा एकदा आर्यनच्या बॉलिवूड डेब्युविषयी चर्चा जोर धरत आहेत.आर्यन बॉलिवूड डेब्यु करणार हे तर पक्के आहे.पण केव्हा? हा खरा प्रश्न आहे. सध्या आर्यनच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल ब-याच चर्चा रंगताहेत.आर्यन अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिच्यासोबत बॉलिवूड डेब्यू करणार, अशी बातमी मध्यंतरी आली. यानंतर आर्यन नव्यासोबत नाही तर श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूरसोबत डेब्यू करणार, अशीही चर्चा रंगली.मात्रा आता नव्या नवेलीसह तो स्क्रिन शेअर करणार असल्याच्याही चर्चा होत आहेत.