दिवाली सिडनी में मनाएंगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2016 18:04 IST2016-10-06T12:34:52+5:302016-10-06T18:04:52+5:30

सुरवीन चावला सध्या 24 या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेचे काही भाग प्रसारित व्हायचे शिल्लक असले तरी ...

Diwali will celebrate in Sydney | दिवाली सिडनी में मनाएंगे

दिवाली सिडनी में मनाएंगे

रवीन चावला सध्या 24 या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेचे काही भाग प्रसारित व्हायचे शिल्लक असले तरी या मालिकेची सगळे चित्रीकरण काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले आहे. या मालिकेचे चित्रीकरण संपल्याची बातमी अनिल कपूरनेच सोशल नेटवर्किंग साईटवरून दिली होती. या मालिकेचे चित्रीकरण संपल्यानंतर आता सुरवीन काही दिवसांसाठी भारताच्या बाहेर फिरायला जाणार आहे. काहीच दिवसांत दिवाळी सुरू होणार आहे. यंदाची दिवाळी ही सुरवीनसाछी खास असणार आहे. कारण यंदाची दिवाळी सुरवीन सिडनमध्ये साजरी करणार आहे. सिडनीमध्ये भारतीयांसारठी साजऱ्या होणाऱ्या दिवाळीला सुरवीन प्रमुख पाहुणी म्हणून जाणार आहे. ऑस्ट्रेलियात सुरवीनचे अनेक फॅन्स आहेत. त्यामुळे सिडनीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या मंडळींनी तिची प्रमुख पाहुणी म्हणून निवड केली आहे. ती तिथे जाऊन तिच्या फॅन्ससोबत गप्पा मारणार आहे. तसेच त्यांच्यासोबत नृत्यदेखील सादर करणार आहे. 

Web Title: Diwali will celebrate in Sydney