बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेच्या दिवाळी विशेष भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 13:38 IST2018-11-02T13:35:16+5:302018-11-02T13:38:26+5:30

दिवाळीच्या सगळ्या दिवसात खास ठरणार आहे ते लक्ष्मीपूजन.. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर म्हणजेच ७ नोव्हेंबरला बाळू आणि महालक्ष्मीची भेट होणार आहे.

Diwali vishesh episodes in Balumamachya Navan Changbhal | बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेच्या दिवाळी विशेष भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार या गोष्टी

बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेच्या दिवाळी विशेष भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार या गोष्टी

कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. कलाकारांचा अभिनय, कथा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे, जे मालिकेच्या टीआरपी मधून देखील दिसून येते. बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेद्वारे पहिल्यांदाच संत श्रेष्ठ बाळूमामांचा प्रवास प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. 

मयप्पाने काही दिवसांपूर्वी चिडून बाळूला गावाबाहेर पाठविण्याचा निर्णय घेतला होता. गावा बाहेर चंदुलाल शहा याच्याकडे बाळू सालगडी म्हणून काम करत आहे. पण चंदुलालच्या आईला मात्र बाळू घरात राहाण पसंत नाहीये. ती अनेक कामं देऊन बाळूला त्रास देण्याचा प्रयत्न करतेय. मालिकेमध्ये आता प्रेक्षकांना दिवाळी विशेष भाग बघायला मिळणार आहेत. ऐन दिवाळीत बाळू घरापासून दूर असल्याने सुंदरा नाराज आहे तर चंदूलाल बाळूला आमराईमध्ये पाठविण्याचा निर्णय घेणार आहे. परंतु चंदुलालची बायको त्याच्या मनाची समजूत घालणार असून ती त्याला सांगणार आहे की, बाळू आधीच त्याच्या घरापासून दूर आहे, तर आपण त्याला दिवाळीनंतर आमराई मध्ये पाठवूया... चंदुलाल देखील या गोष्टीला संमती दर्शवून त्याचा निर्णय माघारी घेणार आहे. चंदुलालच्या घरी गाईची पूजा करून वसूबारस तसेच दिवाळीच्या पहिल्या दिवशी बाळूला ओवाळून, अभ्यंगस्नान देखील होणार आहे... 

दिवाळीच्या सगळ्या दिवसात खास ठरणार आहे ते लक्ष्मीपूजन.. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर म्हणजेच ७ नोव्हेंबरला बाळू आणि महालक्ष्मीची भेट होणार आहे. या भेटीनंतर कोणते नवे वळण येणार मालिकेत हे प्रेक्षकांना बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेच्या दिवाळी विशेष भागात पाहायला मिळणार आहे. 

दिवाळीत बाळू आणि सुंदरा एकत्र नसले तरी सुंदरा बाळूसाठी दिवाळीच्या निमित्ताने फराळ पाठवणार आहे आणि मयप्पा हा फराळ घेऊन बाळूला भेटायला जाणार आहे. त्यामुळे आता त्या दोघांच्या भेटीत काय घडते. बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेत बाळूची दिवाळी कशी जातेय हे पाहाणे खरंच रंजक असणार आहे. 

बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेचे दिवाळी विशेष भाग प्रेक्षकांना ५ नोव्हेंबर पासून संध्याकाळी ७.३० वाजता पाहायला मिळणार आहे. 
 

Web Title: Diwali vishesh episodes in Balumamachya Navan Changbhal