सुखाच्या सरींनी हे मन बावरे आणि जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये दिवाळी सेलिब्रेशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 16:35 IST2019-10-26T16:32:11+5:302019-10-26T16:35:08+5:30

सगळीकडेच रोषणाई, कंदिल, दिव्यांची आरास, तोरणं अस प्रसन्न वातावरण आहे... आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सणासाठी म्हणजेच दिवाळीसाठी ही जय्यत तयारी सुरू आहे.

Diwali Celebration in sukhacha dari he man baware | सुखाच्या सरींनी हे मन बावरे आणि जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये दिवाळी सेलिब्रेशन!

सुखाच्या सरींनी हे मन बावरे आणि जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये दिवाळी सेलिब्रेशन!

सगळीकडेच रोषणाई, कंदिल, दिव्यांची आरास, तोरणं अस प्रसन्न वातावरण आहे... आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सणासाठी म्हणजेच दिवाळीसाठी ही जय्यत तयारी सुरू आहे... मग मालिका का बर मागे राहतील... कलर्स मराठीवरील सुखाच्या सरींनी हे मन बावरे आणि जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये दिवाळी सेलिब्रेशन मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये सिध्दी – शिवा आणि सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेमध्ये अनु – सिध्दार्थची  लग्नानंतरचा हा पहिलाच दिवाळसण आहे... त्यामुळे परत्येक दिवस मोठ्या आनंदात साजरा होणारा आहे... पाडवा, लक्ष्मीपूजन... सिध्दी – शिवा आणि अनू – सिध्दार्थचा हा पहिला पाडवा असणार आहे. तर भाऊबीज देखील बघायला मिळणार आहे सिध्दार्थ – संयु, शिवा – सोनीची...

सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेमध्ये आता अनुला देखील सिध्दार्थबद्दल प्रेम वाटू लागले आहे... आजवर सिध्दार्थने अनुजवळ अनेकदा त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत पण आता अनु तिच्या मनातल्या भावना सिध्दार्थला पहिल्या पाडव्याच्या निमित्ताने सांगु शकेल की सान्वी नवी खेळी खेळेल हे बघणे रंजक असणार आहे. सिध्दी आणि शिवाच्या नात्यात अजूनही कटुता आहे आणि त्याचा फायदा मंगल घेत आहे… दिवाळी काशी साजरी होईल ? पाडवा कसा करतील हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

Web Title: Diwali Celebration in sukhacha dari he man baware