'या' भीतीमुळे दोनदा पळाला होता दिव्यांका त्रिपाठीचा Ex- Boyfriend, अखेर 'या' तारखेला अडकणार लग्नबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 12:57 IST2019-04-19T12:57:16+5:302019-04-19T12:57:50+5:30

लग्नाचे प्रि- सेलिब्रेशन 18 एप्रिलपासून सुरू होणार आहे. पारंपरिक पंजाबी पद्धतीने शरद आणि रिप्ची यांचे लग्न होणार आहे.

Divyanka Tripathis Ex Boyfriend Sharad Malhotra Is Now Marrying To Girlfriend Ripchi Bhatiya | 'या' भीतीमुळे दोनदा पळाला होता दिव्यांका त्रिपाठीचा Ex- Boyfriend, अखेर 'या' तारखेला अडकणार लग्नबंधनात

'या' भीतीमुळे दोनदा पळाला होता दिव्यांका त्रिपाठीचा Ex- Boyfriend, अखेर 'या' तारखेला अडकणार लग्नबंधनात

टीव्ही अभिनेता  शरद मल्होत्राच्याही लग्नाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. रिप्ची भाटियासोबत 20 एप्रिलला शरद लग्न करणार आहे. त्याच्या लग्नाचे प्रि- सेलिब्रेशन 18 एप्रिलपासून सुरू होणार आहे. पारंपरिक पंजाबी पद्धतीने शरद आणि रिप्ची यांचे लग्न होणार आहे. शरद सध्या  'मुस्कान' मालिकेत झळकत असून त्याला  मालिकेच्या चित्रीकरणाचे वेळापत्रक सांभाळून आपल्या लग्नाची तयारी करावी लागत आहे. त्यामुळे त्याला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

रिप्ची ही फॅशन डिझायनर असून गेल्या कित्येक महिन्यांपासून  दोघांच्या अफेअरची चर्चा मीडियात सुरू होती. मात्र शरदने त्याच्या अफेरबाबत मौन बाळगले होते. योग्य वेळ आल्यावरच यावर उत्तर देणार असल्याचे त्याने म्हटले होते. काही महिन्यांपूर्वीच त्याने रिप्चीसह सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.

रिप्चीच्या अगोदर शरदचे दिव्यांका त्रिपाठी आणि पूजा बिष्ठ यांच्यासह अफेअर खूप गाजले होते. दोघींसोबतही लग्न जवळपास ठरले होते पण त्यांचे नाते जमू शकले नाही. 2015 मध्ये त्याचे  दिव्यांका त्रिपाठीसोबत त्याचे ब्रेकअप झाले. दोघे सुमारे 8 वर्षे एकमेकांना डेट करत होते. पण सांगितले जाते की, दिव्यांकाला लग्नाचे कमिटमेंट हवे होते आणि शरद यासाठी तयार नव्हता. नंतर दिव्यांकाने  'ये है मोहब्बतें' मधील तिचा को-एक्टर विवेक दहियासोबत लग्न केले.


दिव्यांकानंतर शरदचे अफेयर 'स्प्लिट्स विला' फेम पूजा बिष्टसोबत सुरु झाले. पूजाने एका इंटरव्यूमध्ये सांगितले होते की, शरद डेटिंगच्या पहिल्या दिवशीच लग्नाविषयी बोलला होता. मात्र, दोन वर्षातच हे नातेही तुटले. शरदचे दोन  ब्रेकअप झाल्यामुळे जेव्हा जेव्हा लग्नाचा विषय यायचा त्यावेळी खूप नर्व्हस फिल करायचा. त्यामुळे लग्नाच्या टेन्शनमुळे दोन वेळा त्याने पळून जाण्याचाही प्रयत्न केल्याचे बोलले जाते.   

Web Title: Divyanka Tripathis Ex Boyfriend Sharad Malhotra Is Now Marrying To Girlfriend Ripchi Bhatiya