कधी काळी बहन जी म्हणून उडवली जायची खिल्ली,आता तिच्यावरच होतात फिदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 14:52 IST2018-08-07T14:33:53+5:302018-08-07T14:52:24+5:30
'ये हैं मोहब्बते'या मालिकेतील मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांना भावली आहे. त्यापैकी रसिकांची लाडकी म्हणजे इशी माँ.

कधी काळी बहन जी म्हणून उडवली जायची खिल्ली,आता तिच्यावरच होतात फिदा
छोट्या पडद्यावर सध्या विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करत आहेत. मालिकांच्या कथानकामधील रंगतदार वळण यामुळे काही मालिका रसिकांच्या मनात घर करुन गेल्या आहेत. अशाच मालिकांपैकी एक मालिका म्हणजे 'ये हैं मोहब्बते' ही मालिका. या मालिकेने अल्पावधीतच रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं आहे. मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांना भावली आहे. त्यापैकी रसिकांची लाडकी म्हणजे इशी माँ. अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हिने ही भूमिका साकारली आहे. दिव्यांकाची ही भूमिका रसिकांना फारच भावली. घराघरात इशी माँ म्हणूनच तिची ओळख बनली.मात्र सा-यांची इशी माँला बहनजी म्हणून तिची खिल्ली उडवली जायची. ऑनस्क्रीन तिची साधी सरळ दिसणारी इमेमुळे तिला बहनजी बोलले जायचे. याच गोष्टीचा खूप राग ही यायचा. फक्त कपड्यांवरून त्याची स्टाइलवरून माणसांची ओळख होत असेन तर हे चुकीचे आहे.
दुस-यांवर टिका करणे हे खूप सोपं असते.लोक माझ्या बाबतीत काय बोलतात या गोष्टींचा मी जास्त विचार नाही करत. लग्नानंतर माझ्यात खूप बदल झाला.मुळात लग्नानंतर एक सकारात्मक बदल झाला या गोष्टीचा जास्त आनंद वाटतो. त्यामुळे इतर गोष्टींना दुर्लक्ष करा कारण कुछ तो लोग कहेंगे......लोगों का काम है केहना.
मध्यंतरी दिव्यांका त्रिपाठी या मालिकेतून एक्झिट घेणार अशा चर्चा होत्या.मालिकेत इशी माँ म्हणजेच दिव्यांकाचा अपघाती मृत्यू झाल्याचे दाखवलं गेले. हे सगळं मालिकेच्या कथानकाचा भाग असल्याचे दाखवलं असलं तरी दिव्यांकाच्या एक्झिटमागे वेगळेच कारण असल्याचे समोर आले होते. दिव्यांकाच्या एक्झिटमागे एक गोड कारण असल्याच्या चर्चा होत्या.ती लवकरच आई बनणार आहे.ती प्रेग्नन्ट असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. तिच्या ये है मोहब्बते मालिकेतील एक्झिटमागे हेच गोड कारण असल्याच्या चर्चा होत्या.