‘राधाकृष्ण’ मालिकेसाठी दिव्या दत्ता करते हे काम !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 05:23 PM2018-10-01T17:23:36+5:302018-10-01T17:25:58+5:30

छोट्या पडद्यावरील आगामी राधा कृष्ण पौराणिक मालिकेच्या प्रसारीत होणा-या भागाची सा-यांना प्रतीक्षा आहे. मालिकेत घडणा-या या घटनेची उत्कंठा रसिकांमध्ये पाहायला मिळत आहे.

Divya Dutta to lend her voice for RadhaKrishn | ‘राधाकृष्ण’ मालिकेसाठी दिव्या दत्ता करते हे काम !

‘राधाकृष्ण’ मालिकेसाठी दिव्या दत्ता करते हे काम !

googlenewsNext

अभिनेत्री दिव्या दत्ताची ''हमको ऐसा वैसा ना समझो.. हम बडे काम की चीज'' अशीच अवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण सिनेमात काम नसलं तरी ती मालिकेत बिझी आहे. ब-याच दिवसांपासून सिनेमात दिसली नाही. नसली तरी आता तिने छोट्या पडद्याचा आधार घेतला आहे.‘राधाकृष्ण’ ही आपली आगामी मालिका भव्य करण्यासाठी ‘स्टार भारत’ वाहिनी कोणतीही कसर शिल्लक ठेवत नाहीये. या मालिकेसाठी उभारण्यात आलेल्या भव्य सेटची चर्चा प्रेक्षकांमध्ये होत असून मालिकेच्या प्रोमोंमुळे तिच्याविषयीची उत्सुकता अजूनच वाढलेली आहे.

आता या मालिकेसाठी आणखी एका गुणी अभिनेत्रीची निवड करण्यात आली असून तिचे नाव आहे दिव्या दत्ता. अर्थात या मालिकेत दिव्या दत्ता ही एक अभिनेत्री म्हणून सहभागी होणार नसून तिने या मालिकेच्या कथानकाची निवेदिका म्हणून आपला आवाज देण्याचे मान्य केले आहे.

यासंदर्भात दिव्या दत्ता म्हणाली, “राधाकृष्ण मालिकेशी मी निगडित होत असल्याचा मला आनंद होत असून मला राधाकृष्णाची प्रेमकथा अतिशय आवडते. या दोघाच्या प्रेमकथा ऐकत ऐकत मी मोठी झाले असले, तरी मी आजवर टीव्हीवर त्यासंदर्भात एकही मालिका पाहिलेली नाही. आता ही मालिका लवकरात लवकर प्रसारित व्हावी, अशी माझी इच्छा असून यासारख्या भव्य मालिकेला माझा आवाज देऊ करण्याची संधी मला मिळाली, याचा मला खूप आनंद होत आहे.”

सुरूवातीपासूनच पौराणिक मालिकांना रसिकांचे प्रचंड प्रेम मिळत आले आहे. मालिकेप्रमाणे त्यातील  व्यक्तिरेखा रसिकांच्या आजही लक्षात असतात. पौराणिक विषयांवरील मालिका हा टीव्ही मालिकांमधील नवा कल असून त्या प्रेक्षकांमध्ये भरपूर लोकप्रियही होतात. आता ‘स्टार भारत’ वाहिनीवरही भारतीय संस्कृतीतील अजरामर प्रेम कहाणीचे- राधा-कृष्णाच्या प्रेमकथेचे- भव्य सादरीकरण होणार आहे. सिद्धार्थ कुमार तिवारी यांची निर्मिती असलेल्या ‘राधा-कृष्ण’ नावाच्या या मालिकेत दिग्गज कलावंतांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. छोट्या पडद्यावरील आगामी राधा कृष्ण पौराणिक मालिकेच्या प्रसारीत होणा-या भागाची सा-यांना प्रतीक्षा आहे.. मालिकेत घडणा-या या घटनेची उत्कंठा रसिकांमध्ये पाहायला मिळत आहे.
 

 

Web Title: Divya Dutta to lend her voice for RadhaKrishn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.