"याच्यापेक्षा वाईट...", 'मी संसार माझा...' मालिकेतील 'त्या' सीनवरुन झालेल्या ट्रोलिंगवर दिग्दर्शकाची प्रतिक्रिया, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 12:29 IST2026-01-01T12:25:07+5:302026-01-01T12:29:03+5:30
काही दिवसांपू्र्वीच 'मी संसार माझा रेखिते' मालिकेतील एक सीन पाहून प्रेक्षक चिडले आहेत.यावर मालिकेच्या दिग्दर्शकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

"याच्यापेक्षा वाईट...", 'मी संसार माझा...' मालिकेतील 'त्या' सीनवरुन झालेल्या ट्रोलिंगवर दिग्दर्शकाची प्रतिक्रिया, म्हणाले...
Television: छोट्या पडद्यावरील मालिकांचा प्रेक्षकवर्ग हा घराघरात आहे. या मालिका प्रेक्षक जितक्या आवडीने बघतात. तितकेच ते मालिकांबद्दल व्यक्त होताना दिसतात. अलिकडेच १ डिसेंबर ‘मी संसार माझा रेखिते’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत अभिनेत्री दीप्ती केतकर प्रमुख भूमिका साकारत आहे. तर, तिच्या नवऱ्याची भूमिका अभिनेता हरीश दुधाडे साकारत आहे. अविनाश आणि अनुप्रिया अशी त्यांच्या पात्रांची नावे आहेत. नवऱ्याचा जाच, सासूचा छळ या सगळ्या गोष्टी या मालिकेत पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, अलिकडेच मालिकेच्या प्रोमोची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा रंगली होती.यामध्ये बायको अनुप्रिया दुसऱ्या पुरुषाचं कौतुक करते म्हणून अविनाशने तिची रागात मान धरून… तिला जबरदस्ती टोपभर बासुंदी प्यायला लावली असा सीन पाहायला मिळतो.
हा प्रोमोवर प्रेक्षकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. आता त्यावर मालिकेचे दिग्दर्शकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नुकताच रवी करमकर यांनी राजश्री मराठीसोबत संवाद साधला. त्यादरम्यान, मालिकेच्या ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे. मला वाटत दिग्दर्शक म्हणून मी माझं काम करत राहावं. ट्रोलिंग करणारे ट्रोल करतच राहतील, तर काहीजण कौतुकही करतील.त्याच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर कधी दिग्दर्शन करता येणार नाही.
यानंतर ते म्हणाले,"डेली सोपमध्ये आपल्याला दिवसाला १३ ते १४ तास शूटिंग करावं लागतं. तर अशा गोष्टींकडे बघायलाच वेळ नसतो. आपल्याला आपलं काम पूर्ण करायचं असतो. कधीकधी ट्रोलिंग पण कॉम्प्लिमेंटरी घेतली पाहिजे. त्याच्यातून आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो. अनेकदा त्याबद्दल इतर लोकांकडून कळत असतं.मग मी म्हणतो, ठीक आहे, आपण याच्यातून सुधाऱणा करूया. अशा तऱ्हेने पुढे जातो."
मालिकेतील त्या हिंसक सीनबद्दल काय म्हणाले?
"आतापर्यंत आलेल्या अशा अनेक मालिका आहेत. ज्यांमध्ये यापेक्षा वाईट सीन, प्रसंग त्यांमध्ये दाखवले गेले आहेत. याच्यापेक्षा वाईट सीन मी अनेक मालिकांमध्ये बघितले आहेत. हा तर अगदीच रोहिणी ताईंनी लिहिलेला सीन होता."
रवी करमरकर हे मालिका विश्वातील नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आजवर अनेक हिंदी, मराठी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. छोट्या पडद्यावरील गाजलेली आई कुठे काय करते या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा देखील त्यांनीच सांभाळली होती.