दिपिका सिंगने शेअर केला बाळाचा पहिला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2017 13:50 IST2017-06-21T08:20:41+5:302017-06-21T13:50:41+5:30

'दिया और बाती' फेम दिपिका सिंगने गेल्या महिन्यात गोंडस बाळाला जन्म दिला. दिपिकाच्या चाहत्यांनीही गुड न्युज समजताच तिच्यावर शुभेच्छांचा ...

Dipika Singh shared her first photo | दिपिका सिंगने शेअर केला बाळाचा पहिला फोटो

दिपिका सिंगने शेअर केला बाळाचा पहिला फोटो

'
;दिया और बाती' फेम दिपिका सिंगने गेल्या महिन्यात गोंडस बाळाला जन्म दिला. दिपिकाच्या चाहत्यांनीही गुड न्युज समजताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. शुभेच्छा देते वेळी अनेक चाहत्यांनी तिच्या बाळाचा फोटो पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र नुकत्याच जन्मलेल्या बाळाचा फोटो दिपिकाला सोशल मीडियावर अपलोड करायचा नव्हता. अखेर दिपिकाचे बाळ हे एक महिन्याचे झाले आहे. इतके दिवस चाहते तिच्या बाळाला पाहण्याची प्रतिक्षा करत होते. अखेर त्यांना या बाळाची झलक पाहायला मिळालीच. खुद्द दिपिकाने तिच्या बाळाचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या फोटोत तिने बाळाला कडेवर घेतल्याचे पाहायला मिळत आहे. फोटोसह तिने सगळ्यांचे आभार मानले आहे. यात तिने म्हटले आहे की,आज माझे बाळ 1महिन्याच होत आहे. तुम्ही दिलेल्या शुभेच्छा आणि आशिर्वाद असेच सदैव राहुद्या.आई होण्याचा अनुभव खूपच सुंदर आहे. मुळात आईचा जॉब हा फुल टाईम जॉब आहे.त्याचा आनंदही काही औरच आहे.त्यामुळे सध्या मी माझ्या मुलाचं बालपण एन्जॉय करतेय.मी मालिकामध्ये कधी परतणार असाही प्रश्न अनेक चाहते मला विचारतायेत. सध्या तरी या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नसले तरी आणखी काही वर्ष तरी मी या सगळ्या गोष्टींपासून लांब राहणार आहे. माझे कुटुंब हेच माझी पहिली प्रायोरीटी असल्यामुळे मला आधी कुटुंबाला वेळ द्यायचे आहे. करिअर विषयी कोणत्याची गोष्टी डोक्यात नाहीत. फक्त आणि फक्त बेबी, पापा आणि मम्मा इतकेच विचार डोक्यात सुरू असल्याचे दिपिकाने म्हटले आहे.

Web Title: Dipika Singh shared her first photo