तब्बल २० दिवसानंतर अखेर आई झाल्यानंतर दीपिका कक्करला रुग्णालयातून सुट्टी, दाखवली बाळाची झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 16:42 IST2023-07-10T16:39:57+5:302023-07-10T16:42:12+5:30

फोटोंमध्ये दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसत आहेत.

Dipika kakar and her newborn baby discharge from-hospital after 20 days-photos-viral-shoaib-ibrahim | तब्बल २० दिवसानंतर अखेर आई झाल्यानंतर दीपिका कक्करला रुग्णालयातून सुट्टी, दाखवली बाळाची झलक

तब्बल २० दिवसानंतर अखेर आई झाल्यानंतर दीपिका कक्करला रुग्णालयातून सुट्टी, दाखवली बाळाची झलक

'ससुराल सिमर का' फेम दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम काही दिवसांपूर्वी आई-वडील झाले.. दीपिकाने 21 जून रोजी मुलाला जन्म दिला होता, परंतु दीपिकाच्या बाळाची प्रीमॅच्योर डिलीव्हरी झाली होती. त्यामुळे बाळाला अनेक दिवस एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, आता दीपिकाच्या बाळाला अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये शोएब आपल्या मुलाला  घेऊन जाताना दिसत आहे. 

या फोटोंमध्ये दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसत आहेत. शोएब आणि दीपिका पापाराझींसाठी पोज देताना दिसत आहेत. शोएब आणि दिपिका त्यांच्या डेली व्लॉगमधून त्यांच्या बाळाची हेल्थ अपडेट देत होते. त्यांचे व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत. या 20 दिवसात बाळाच्या काळजीने दोघेही चिंतेत होते. पण 20 दिवसांनी दिपिका आणि बाळ या दोघांना रुग्णालयातून सुट्टी दिल्यानंतर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. दोघेही बाळाला घेऊन सुखरूपपणे घरी पोहोचले.  शोएब आणि दीपिका पापाराझींसाठी पोज देताना दिसत आहेत. 


दरम्यान दीपिका कक्करने जानेवारीमध्ये तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. तिच्या फोटोशूटचा एक सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत अभिनेत्रीने लिहिले की, 'ही बातमी तुम्हा सर्वांसोबत कृतज्ञता, आनंद, उत्साह आणि अस्वस्थतेने शेअर करत आहे. हा आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर टप्पा आहे. होय, आम्ही आमच्या पहिल्या बाळाची अपेक्षा करत आहोत. तुमच्या प्रार्थना आणि प्रेमाची खूप गरज आहे. दीपिका कक्कडने २२ फेब्रुवारी २०१८ रोजी शोएब इब्राहिमसोबत लग्न केले.लग्नाच्या पाच वर्षानंतर दोघे आई-बाबा झालेत. 

Web Title: Dipika kakar and her newborn baby discharge from-hospital after 20 days-photos-viral-shoaib-ibrahim