"500 साल के संघर्ष के बाद"...हातात पणती घेत रामायणच्या 'सीते'ने व्यक्त केला आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 18:12 IST2020-08-05T18:11:52+5:302020-08-05T18:12:57+5:30
यापूर्वी अरुण गोविल यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला होता. त्यांनी भारताच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिले जाणार असल्याचे म्हटले होते.

"500 साल के संघर्ष के बाद"...हातात पणती घेत रामायणच्या 'सीते'ने व्यक्त केला आनंद
राम जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनानंतर सामान्य लोकांसोबतच बॉलिवूडचे सेलिब्रेटीदेखील हा आनंद साजरा करताना दिसतायेत. दरम्यान अभिनेत्री कंगना रणौतनेदेखील सोशल मीडियावर आनंद व्यक्त करताना दिसली. अशातच ‘रामायण’ या मालिकेत सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांनी पोस्ट करत आनंद व्यक्त केला आहे. दीपिका यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये त्यांनी हातात पणती घेतली आहे.
हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी सर्व भारतीयांसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे असे म्हटले आहे. तसेच कॅप्शनमध्ये असेही लिहिले आहे की, 500 वर्षांच्या संघर्षानंतर भगवान राम आज परतले आहेत. दीपिका चिखलियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. त्यांच्या पोस्टवर चाहते हे कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत 18 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. दीपिका चिखलिया सोशल मीडियावर बर्याच अॅक्टिव असतात, तसेच नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांसह संवाद साधत असतात. यापूर्वी अरुण गोविल यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला होता. त्यांनी भारताच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिले जाणार असल्याचे म्हटले होते.
'रामायण'मध्ये आपली ओळख निर्माण केल्यानंतर दीपिका चिखलिया यांनी 90 च्या दशकाच्या सुरुवातीला राजकीय प्रवास सुरू केला. 1991 मध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून त्यांनी वडोदरा येथून विजय मिळवला. याशिवाय दीपिका चिखलिया अखेर आयुष्मान खुरानाच्या 'बाला'सिनेमामध्ये यामी गौतमीच्या आईच्या भूमिकेत झळकल्या होत्या. तसेच दीपिका चिखलियाने सांगितले होते की, 'रामायण'च्या बॉलिवूड व्हर्जनमध्ये हृतिक रोशनला 'राम', आलिया भट्टला 'सीता' आणि वरुण धवन 'लक्ष्मण'च्या भूमिकेत पाहायला आवडेल.