दिल है हिंदुस्तानी या कार्यक्रमाचा परीक्षक बादशहाला केले रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2017 11:18 IST2017-02-01T05:48:54+5:302017-02-01T11:18:54+5:30

दिल है हिंदुस्तानी या कार्यक्रमात करण जोहर, बादशहा, शाल्मली खोलगडे, शेखर रावजियानी परीक्षकाची भूमिका बजावत आहेत. या कार्यक्रमाची सध्या ...

Dil Hai Hindustani, the examiner of the program, has been admitted to the hospital | दिल है हिंदुस्तानी या कार्यक्रमाचा परीक्षक बादशहाला केले रुग्णालयात दाखल

दिल है हिंदुस्तानी या कार्यक्रमाचा परीक्षक बादशहाला केले रुग्णालयात दाखल

ल है हिंदुस्तानी या कार्यक्रमात करण जोहर, बादशहा, शाल्मली खोलगडे, शेखर रावजियानी परीक्षकाची भूमिका बजावत आहेत. या कार्यक्रमाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. या कार्यक्रमातील सगळ्याच स्पर्धकांचे आवज हे एकाहून एक सरस आहेत.
या कार्यक्रमातील परीक्षक बादशहा हा सगळ्यांचा लाडका आहे. पण बादशहा हा सध्या आजारी असल्याने त्याला काही दिवस तरी चित्रीकरण करता येणार नाही. याचा चांगलाच परिणाम दिल है हिंदुस्तानीच्या पुढील भागांवर होणार आहे.
बादशहा गेल्या कित्येक दिवसांपासून खूपच खूश आहे. कारण त्याच्या घरात चिमुकलीचे आगमन झाले आहे. पण त्याच्या आनंदात आता एक विरजण पडले आहे. त्याला कित्येक दिवसांपासून श्वसनाचा खूप त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात भरती करावे लागले. त्याची तब्येत खूपच बिघडल्याने दिल्लीतील नोएडामधील एका हॉस्पिटलमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्यामुळे काही दिवस तरी तो कार्यक्रमाचे चित्रीकरण करू शकणार नाही. त्यामुळे या कार्यक्रमाचे चित्रीकरण आता लांबणीवर टाकावे लागले आहे. बादशहाने या कार्यक्रमाच्या स्पर्धकांना आपले आव्हान म्हणून सादर केलेल्या गाण्यांची यादी शेवटच्या क्षणी बदलावी लागली. याचा परिणाम स्पर्धकांवर झाला. तसेच यामुळे करण जोहर, शाल्मली खोलगडे आणि शेखर रावजियानी या इतर परीक्षकांनादेखील आपल्या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्या तारखा पुढे ढकलाव्या लागल्या. 
खरे तर करण, शाल्मली आणि शेखर हे त्यांच्या त्यांच्या कामात प्रचंड व्यग्र आहेत. त्यामुळे त्यांना त्यांचे शेड्युल बदलणे खूपच कठीण गेले होते. पण तरीही त्यांनी आपल्या या मित्रासाठी ही तडजोड केली.
बादशहाच्या  तब्येतीसाठी सध्य सगळेच प्रार्थना करत आहेत. 





Web Title: Dil Hai Hindustani, the examiner of the program, has been admitted to the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.