'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेत्रीची एन्ट्री, लूक आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 15:46 IST2022-07-09T15:43:32+5:302022-07-09T15:46:32+5:30

Sundara Manamadhye Bharli : आता आणखी एका अभिनेत्रीची सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत एन्ट्री झाली आहे.

'Dil Dosti Duniyadari' fame actress's entry in 'Sundara Manamdhe Bharli' series, Luke came forward | 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेत्रीची एन्ट्री, लूक आला समोर

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेत्रीची एन्ट्री, लूक आला समोर

कलर्स मराठी वाहिनीवरील (Colors Marathi) लोकप्रिय मालिका सुंदरा मनामध्ये भरली ( Sundara Manamadhe Bharli) अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील सर्वच कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. या मालिकेत एकापेक्षा एक हटके पात्र आपल्याला पाहायला मिळतात. नुकतेच या मालिकेत नंदिनी या पात्राने कमबॅक केले आहे. नंदिनीची भूमिका अभिनेत्री अदिती द्रविड हिने शूटिंगला सुरूवात केली आहे. त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीची सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत एन्ट्री झाली आहे. ही अभिनेत्री म्हणजे स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar). 

टीआरपी मराठीच्या रिपोर्टनुसार अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेत एन्ट्री केली आहे. स्वानंदी टिकेकरची भूमिका नेमकी कोणती आहे याबाबत अद्यापही खुलासा झालेला नाही. मात्र प्रोमो पाहून ती अभिमन्यूच्या ऑफिसमध्ये दाखल झालेली दिसते आहे. यावरून ती अभिलाषाप्रमाणे एखादे पात्र साकारेल, अशी शक्यता वर्तवली जाते आहे.

स्वानंदी टिकेकरने 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलेृ. या मालिकेतील मीनल या डॅशिंग मुलीच्या भूमिकेतून ती घराघरात पोहचली. त्यानंतर तिने आणखी काही मालिकांमध्ये काम केले. तिने नुकतंच 'इंडियन आयडॉल मराठी'च्या पहिल्या पर्वाचं सूत्रसंचालन केलं आहे.

स्वानंदी टिकेकर अभिनेत्री शिवाय एक उत्तम गायिका देखील आहे. तिला गाण्याचा वारसा हा तिच्या आईकडून म्हणजेच आरती अंकलीकर टिकेकर यांच्याकडून मिळाला आहे. तर अभिनयाचा वारसा वडील उदय टिकेकर यांच्याकडून मिळाले आहे.

Web Title: 'Dil Dosti Duniyadari' fame actress's entry in 'Sundara Manamdhe Bharli' series, Luke came forward