बिग बॉसच्या घरात रंगणार हा वेगळा खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 12:13 IST2018-05-09T06:43:02+5:302018-05-09T12:13:02+5:30

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल नॉमिनेशन प्रक्रिया पूर्ण झाली ज्यामध्ये घरातील सदस्यांनी एकमेकांसाठी काही गोष्टी स्वीकारल्या तर ...

A different game to play in the Big Boss house | बिग बॉसच्या घरात रंगणार हा वेगळा खेळ

बिग बॉसच्या घरात रंगणार हा वेगळा खेळ

र्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल नॉमिनेशन प्रक्रिया पूर्ण झाली ज्यामध्ये घरातील सदस्यांनी एकमेकांसाठी काही गोष्टी स्वीकारल्या तर काहींचा त्याग केला. पण, काही सदस्यांनी ते करण्यास नकार देखील दिला. उषा नाडकर्णी यांनी अनिल थत्ते यांच्यासाठी नॉमिनेट होण्यासाठी नकार दिला त्यामुळे अनिल थत्ते या आठवड्यासाठी नॉमिनेट झाले. तर भूषण कडूसाठी जुईने तिची कॅप्टनशिप सोडली आणि या आठवड्यासाठी नॉमिनेट झाली. भूषण घराचा नवा कॅप्टन झाल्यामुळे त्याला एक विशेष अधिकार मिळाला ज्याचा वापर करून त्याने रेशम टिपणीसला नॉमिनेशन प्रक्रियेमधून वाचवले. अशाप्रकारे या आठवड्याची घरातून बाहेर जाण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दिलेले कार्य पार पाडणे अनिवार्य असते जे घरातील रहिवाश्यांनी उत्तमरीत्या पार पाडले त्यामुळे बिग बॉस यांनी काही भेटवस्तू स्पर्धकांना दिल्या. बिग बॉसने दिलेल्या या भेटवस्तू स्टोर रुम मधून आस्तादने स्पर्धकांना आणून दिल्या. पुष्कर, अनिल थत्ते, सई त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंमुळे खूपच भाऊक झाले. बिग बॉस मराठीचा आजचा भाग देखील विशेष असणार आहे तेंव्हा बघायला विसरू नका आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.
 

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार आहे आगळावेगळा टास्क. बालपण आयुष्यातील सर्वोत्तम काळ मानला जातो. या वयात प्रत्येकाचे आवडीचे एक खेळणे असते. अनेक गोष्टी त्या खेळण्यांसोबत आपण शेअर केलेल्या असतात. खेळण्यांसमोर आपण आनंद, दु:ख, चिडचिड, घुसमट, अश्या मनातील अनेक भावना व्यक्त केल्या असतील. व्यवहारिक दुनियेत वावरताना आपण कुणाला तर कुणी आपल्याला या खेळण्यांप्रमाणे वागवले असेल. म्हणूनच बिग बॉस खेळ मांडला या कार्यानिमित्त या दोन्ही गोष्टींचा मिलाफ घडवून आणणार आहेत. घरातील सदस्यांची दोन गटामध्ये विभागणी करण्यात येणार आहे. एक टीम लहान मुलांचे पात्र साकारेल तर दुसरी टीम खेळण्यांचे पात्र रंगवतील. बिग बॉसच्या घरात झालेल्या लहान मुलांना त्यांच्या खेळण्यांसोबत सतत खेळून सतवायचे आहे. तर, दिवसभर खेळूनही न चिडणे हा खेळण्याचा उद्देश असेल. या कार्यामध्ये घरातील काही सदस्य बच्चेकंपनी बनून घालणार आहेत दंगा, तर काही सदस्य बनणार आहेत खेळणी. हे चिल्लर पार्टी आणि त्यांचे नखरे खेळणी बनलेल्या सदस्यांना बेहाल करून सोडणार आहेत हे नक्की.

Web Title: A different game to play in the Big Boss house