कसौटी जिंदगी की फेम श्वेता तिवारीच्या मुलांचा हा क्यूट व्हिडिओ तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 08:00 IST2018-09-29T12:32:30+5:302018-10-01T08:00:00+5:30

कसौटी जिंदगी की या मालिकेतील प्रेरणा या भूमिकेमुळेच तिला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. या मालिकेप्रमाणेच श्वेताने जाने क्या बात हुई, परवरिश यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. श्वेता नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते.

Did you watch this cute video of Fem Shweta Tiwari's children of Kasuri Zindagi? | कसौटी जिंदगी की फेम श्वेता तिवारीच्या मुलांचा हा क्यूट व्हिडिओ तुम्ही पाहिला का?

कसौटी जिंदगी की फेम श्वेता तिवारीच्या मुलांचा हा क्यूट व्हिडिओ तुम्ही पाहिला का?

कसौटी जिंदगी की या मालिकेचा नवा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. एकेकाळी गाजलेला हा शो पुन्हा एकदा परतला असल्याने या शोच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. श्वेता तिवारीने साकारलेली प्रेरणा ही भूमिका या नव्या मालिकेत एरिका फर्नांडिस साकारत असून अनुरागच्या भूमिकेत पार्थ समंथन दिसत आहे तर कोमिलाकाची भूमिका ये रिश्ता क्या कहलाता है फेम हिना खान साकारणार आहे. ही मालिका तब्बल १८ वर्षांनी पुन्हा प्रसारित होणार आहे. टीव्हीवर अनेक प्रसिद्ध कलाकार देखील यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.

कसौटी जिंदगी की या मालिकेच्या नवीन सिझनमध्ये झळकत असलेल्या एरिकाने  कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेत काम केले होते. या मालिकेतील तिने साकारलेल्या सोनाक्षी या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. एरिका ही प्रेक्षकांची लाडकी असली तरी ते तिला प्रेरणा म्हणून स्वीकारतील की नाही हे काही दिवसांतच कळेल. श्वेताने तिच्या अभिनयातून प्रेक्षकांमध्ये एक अढळ स्थान निर्माण केले आहे. प्रेरणा या भूमिकेमुळेच तिला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. या मालिकेप्रमाणेच श्वेताने जाने क्या बात हुई, परवरिश यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. श्वेता नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. श्वेताला पलक आणि रियांश अशी दोन मुले आहेत. पलक लवकरच अभिनयक्षेत्रात पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. श्वेताचे पती अभिनव कोहलीने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पलक आणि रियांश यांचा एक क्यूट व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. दिदीच्या पावलावर पाऊल ठेवत... असे या व्हिडिओला त्याने कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओत पलक आणि रियांश दोघे योगासने करताना दिसत आहे. छोटूसा रियांश पलकला पाहून तिच्याप्रमाणेच योगा करण्याचा प्रयत्न करत आहे. 

श्वेताच्या फॅनने या व्हिडिओला चांगलीच पसंती दर्शवली आहे. अनेकांनी या व्हिडिओला लाइक केले असून अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

 

Web Title: Did you watch this cute video of Fem Shweta Tiwari's children of Kasuri Zindagi?