'आई कुठे काय करते'मधील अविनाश देशमुखची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री, दिसते खूप सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 13:05 IST2022-02-19T07:00:00+5:302022-02-24T13:05:37+5:30

अभिनय क्षेत्रात काम करणा-या पती-पत्नी कलाकारांच्या कितीतरी जोड्या आहेत.

Did you seen marathi actor shantanu moghe's wife She is also a famous actress | 'आई कुठे काय करते'मधील अविनाश देशमुखची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री, दिसते खूप सुंदर

'आई कुठे काय करते'मधील अविनाश देशमुखची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री, दिसते खूप सुंदर

सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं.  तसेच त्यांच्या अफेयर, लव्ह लाइफबद्दल जाणून घ्यायला देखील चाहत्यांना आवडतं. ते कुठे राहतात, त्यांना काय आवडतं त्यांच्या कुटुंबात कोणकोणत असते, हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात.  आज आम्ही तुम्हाला अभिनेता शंतनु मोघेबाबत सांगणार आहोत. 

अनेकांचे जोडीदार हे स्वतःही याच क्षेत्रातले आहेत. अभिनय क्षेत्रात  काम करणा-या पती-पत्नी कलाकारांच्या कितीतरी जोड्या आहेत. अशीच एक जोडी आहे शंतनु मोघे  आणि त्याच्या पत्नीची. अविनाश देशमुखची भूमिका अभिनेता शंतनु मोघेने साकारली आहे. शंतनु मोघेच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात.

अभिनेता शंतनु मोघेच्या पत्नीचे नाव आहे प्रिया मराठे.प्रिया मराठे हे हिंदी आणि मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय नाव आहे. सध्या ती झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत काम करते आहे. या सुखांनो या या मालिकेतून प्रिया मराठेने छोट्या पडद्यावर एंट्री मारली. यानंतर चार दिवस सासूचे या मालिकेत तिने काम केले. तू तिथे मी या मालिकेत तिने साकारलेली निगेटिव्ह भूमिका खूप गाजली.

याशिवाय कसम से या मालिकेतून तिने हिंदी मालिकांमध्ये पदार्पण केले.मात्र 'पवित्र रिश्ता' मालिकेतील भूमिकेमुळे ती घराघरात पोहचली. 'बडे अच्छे लगते' है,कॉमेडी सर्कसमध्येही ती झळकली. तिने 'साथ निभाना साथिया' या मालिकेतही ती दिसली.

तर अभिनेता शंतनु मोघेने स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिके त छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. तसेच श्री राम समर्थ या चित्रपटात त्याने काम केले आहे. याशिवाय त्याने बऱ्याच मालिकेत काम केले आहे. तसेच त्याने नाटकातही काम केले आहे.

Web Title: Did you seen marathi actor shantanu moghe's wife She is also a famous actress