'बाळूमामाच्या नावानं चांगलभलं' फेम अभिनेत्याच्या पत्नीला पाहिलंत का?, शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 15:23 IST2023-01-03T15:23:20+5:302023-01-03T15:23:56+5:30

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balumama Chya Navan Chang Bhala) या लोकप्रिय मराठी मालिकेतील ‘बाळूमामा’ अर्थात ही भूमिका साकारणारा अभिनेता सुमीत पुसावळे (Sumeet Pusavale ) १४ डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकला.

Did you see the wife of the 'Balumama' fame actor's wife?, shared photo | 'बाळूमामाच्या नावानं चांगलभलं' फेम अभिनेत्याच्या पत्नीला पाहिलंत का?, शेअर केला फोटो

'बाळूमामाच्या नावानं चांगलभलं' फेम अभिनेत्याच्या पत्नीला पाहिलंत का?, शेअर केला फोटो

बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balumama Chya Navan Chang Bhala) या लोकप्रिय मराठी मालिकेतील ‘बाळूमामा’ अर्थात ही भूमिका साकारणारा अभिनेता सुमीत पुसावळे (Sumeet Pusavale ) १४ डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकला. सुमीतने मोनिका महाजनसोबत लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान आता नवीन वर्षाच्या सुरूवातील सुमीत पुसावळेने पत्नीसोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला आहे. 

सुमीत व मोनिका यांनी सांगोला येथे  पारंपरिक पद्धतीने लग्नाच्या आणाभाका घेतल्या. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. दरम्यान आता नवीन वर्षांच्या सुरुवातीला सुमीत पुसावळेने पत्नीसोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.


अभिनेता सुमीत पुसावळेने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. लागिर झालं जी, स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकांमध्येही त्याने काम केले आहे. ‘बाळूमामाच्या नावाने चांगभलं’ या मालिकेने त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेत तो मुख्य भूमिकेत पाहायला मिळतोय.

 सुमित पुसावळे हा मूळचा दिघंजी गावचा आहे. शालेय शिक्षणानंतर तो पुण्यात आला. इथे त्याने हॉटेल मॅनेजमेंटची पदवी मिळवली आणि काही काळ याच क्षेत्रात नोकरी केली. त्याला स्वत:चे रेस्टॉरंट उभारायचे होते. पण लहानपणापासूनच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे त्याच्यात कलेची आवड निर्माण झाली आहे.

Web Title: Did you see the wife of the 'Balumama' fame actor's wife?, shared photo