'तारक मेहता'मधील जेठालालच्या खऱ्या पत्नीला पाहिलंत का?, आहे खूप स्टायलिश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 14:57 IST2021-06-01T14:57:13+5:302021-06-01T14:57:42+5:30

जेठालालच्या भूमिकेतून अभिनेता दिलीप जोशीने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

Did you see Tarak Mehta ka Ulta Chashma fame Jethalal's real wife ?, She is very stylish | 'तारक मेहता'मधील जेठालालच्या खऱ्या पत्नीला पाहिलंत का?, आहे खूप स्टायलिश

'तारक मेहता'मधील जेठालालच्या खऱ्या पत्नीला पाहिलंत का?, आहे खूप स्टायलिश

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या मालिकेतील प्रत्येक पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या पात्रांमधील जेठालाल आणि दयाबेन यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. जेठालाल उर्फ दिलीप जोशीच्या खऱ्या फॅमिलीबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे.

जेठालालचे खरे नाव दिलीप जोशी असून तो टेलिव्हिजन आणि हिंदी सिनेसृष्टीत सक्रीय आहे. मात्र त्याला खरी ओळख तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून मिळाली. जेठालाल उर्फ दिलीप जोशीने सिनेइंडस्ट्रीत मैंने प्यार किया या चित्रपटातून पदार्पण केले होते. यात दिलीप जोशीने नोकारची भूमिका केली होती.


दिलीप जोशीने सलमान खान आणि माधुरी दीक्षितचा चित्रपट हम आपके है कौनमध्ये काम केले होते. यात त्याने माधुरीचा कजिन भोला प्रसादची भूमिका केली होती. त्यानंतर त्याने बऱ्याच चित्रपटात सहायक भूमिका केल्या.


दिलीप जोशीच्या रिअल लाइफबद्दल सांगायचे तर त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचे नाव नियती तर मुलाचे नाव रित्विक आहे. दिलीप जोशीची पत्नी लाइमलाइटपासून नेहमी दूर राहते. त्याच्या पत्नीचे नाव जयमाला जोशी आहे. त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. दिलीप जोशी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता असूनही त्याची पत्नी लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते.


दिलीप जोशी पूर्णपणे फॅमिली मॅन आहे. सोशल मीडियावर दिलीप आपल्या पत्नी आणि कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असतात.

Web Title: Did you see Tarak Mehta ka Ulta Chashma fame Jethalal's real wife ?, She is very stylish