'तारक मेहता' फेम दयाबेन उर्फ दिशा वकानीच्या बहिणीला पाहिलंत का?, दिसते खूप सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 07:00 IST2022-03-10T07:00:00+5:302022-03-10T07:00:00+5:30

सध्या दिशा वकानी (Disha Vakani) 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Tarak Mehta Ka Ulta Chashma) या मालिकेत काम करताना दिसत नाही. पण जोपर्यंत ती या शोचा भाग होती तोपर्यंत तिने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.

Did you see 'Tarak Mehta' fame Dayaben alias Disha Vakani's sister ?, looks very beautiful | 'तारक मेहता' फेम दयाबेन उर्फ दिशा वकानीच्या बहिणीला पाहिलंत का?, दिसते खूप सुंदर

'तारक मेहता' फेम दयाबेन उर्फ दिशा वकानीच्या बहिणीला पाहिलंत का?, दिसते खूप सुंदर

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Tarak Mehta Ka Ulta Chashma) गेल्या १४ वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहेत. या मालिकेतील प्रत्येक पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोच्या टीआरपीबद्दल बोलायचे तर तिथेही ही मालिका आघाडीवर आहे. या मालिकेत दया बेनची भूमिका अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani)ने साकारली होती. सध्या दिशा वकानी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत काम करताना दिसत नाही. पण जोपर्यंत ती या शोचा भाग होती तोपर्यंत तिने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. 

दिशा वकानीने आपल्या साध्या स्टाईलने सर्वांना वेड लावले. पण आज आपण दिशा वकानीची धाकटी बहीण खुशालीबद्दल बोलणार आहोत. दिशा वकानीची धाकटी बहीण खुशाली ही एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. कदाचित तुमच्यापैकी फार कमी जणांना माहित असेल की खुशाली नाट्यविश्वात खूप प्रसिद्ध आहे.


दिशाला एक भाऊ आहे. जो तिच्यासोबत मालिकेत काम करताना दिसला आहे. तिच्या भावाचे नाव ​​मयूर असून तोदेखील बहिणीप्रमाणेच प्रसिद्ध आहे. 
खुशालीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. यामुळेच तिने नाट्यविश्वात नाव कमावले. दिशा वकानीचे वडील भीम वकानी हे देखील प्रसिद्ध नाटककार आहेत. भीम वकानी यांनीदेखील गुजराती नाटकांमध्ये काम केले आहे. याशिवाय काही सरकारी जाहिरातींमध्येही दिसून आले आहेत. तसेच त्यांनी 'लगान' आणि 'व्हॉट्स युवर राशी' या सुपरहिट चित्रपटांमध्येही काम केले आहे.

दिशा वाकानी, खुशाली आणि मयूर यांना त्यांच्या वडिलांकडूनच अभिनयाचे बालकडू मिळाले, असे म्हणता येईल. खुशाली अनेक गुजराती शोमध्ये अभिनय करताना दिसली आहे. तसेच ती 'ब्लॅक' या बॉलिवूड चित्रपटातही दिसली आहे.

Web Title: Did you see 'Tarak Mehta' fame Dayaben alias Disha Vakani's sister ?, looks very beautiful