तुम्ही 'आई कुठे काय करते'मधील अनघाच्या बहिणीला पाहिलंत का?, दिसायला आहे तिच्या इतकीच सुंदर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 07:00 IST2022-03-19T07:00:00+5:302022-03-19T07:00:00+5:30

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते'मध्ये अनघाची भूमिका अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) हिने साकारली आहे. तिच्या या भूमिकेला रसिकांची खूप पसंती मिळते आहे.

Did you see Aai Kuthe Kay Karte Fame Anagha Aka Ashwini Mhanagade's sister , She looks so beautiful! | तुम्ही 'आई कुठे काय करते'मधील अनघाच्या बहिणीला पाहिलंत का?, दिसायला आहे तिच्या इतकीच सुंदर!

तुम्ही 'आई कुठे काय करते'मधील अनघाच्या बहिणीला पाहिलंत का?, दिसायला आहे तिच्या इतकीच सुंदर!

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते(Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील अनघाने या पात्रानेदेखील अल्पावधीतच घराघरात पोहचली आहे. अनघाची भूमिका अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashwini Mahnagade) हिने साकारली आहे. आज आम्ही अश्विनीच्या बहिणीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. 

अश्विनी महांगडे सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांना अपडेट देत असते. तिच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. काही दिवसांपूर्वी अश्विनीने तिच्या लाइफ पार्टनरबद्दल सोशल मीडियावर सांगितले होते. त्याचे नाव निलेश जगदाळे आहे. अश्विनीला एक भाऊ आणि बहिण आहे. अश्विनीच्या बहिणीचे नाव मृण्मयी महांगडे जाधव आहे. ती वकील असून ती तिच्या क्षेत्रात खूप यशस्वी आहे. नुकताच त्यांना एक पुरस्कार देखील मिळाल्याचे सांगण्यात येते. मृण्मयी अश्विनी इतकीच दिसायला खूप सुंदर आहे. 

अश्विनी महांगडे हिच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ती सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते मालिकेत पहायला मिळते आहे. या मालिकेतील तिच्या अनघाच्या भूमिकेला रसिकांची खूप पसंती मिळते आहे. या मालिकेच्या आधी ती  'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. भरजरी साडी, वजनदार दागिनं, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळे राणू अक्काच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले होते. याशिवाय तिने अस्मिता मालिकेत काम केले आहे. तसेच अश्विनीने टपाल, बॉईज या चित्रपटात काम केले आहे.

Web Title: Did you see Aai Kuthe Kay Karte Fame Anagha Aka Ashwini Mhanagade's sister , She looks so beautiful!