साईबाबांच्या वेशातील 'या' अभिनेत्याला ओळखलं का? 'भाग्य दिले तू मला'मध्ये करतोय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 16:36 IST2023-10-12T16:35:09+5:302023-10-12T16:36:19+5:30
Marathi actor: सध्या सोशल मीडियावर एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा फोटो व्हायरल होत आहे.

साईबाबांच्या वेशातील 'या' अभिनेत्याला ओळखलं का? 'भाग्य दिले तू मला'मध्ये करतोय काम
कलाकार हा त्याच्या अभिनयामुळे, त्याने साकारलेल्या भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या स्मरणात राहत असतो. त्यामुळे प्रत्येक कलाकार आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी वाट्टेल ते करतो. यात अथक मेहनत, कष्ट, भूमिकेशी एकरुप होण्यासाठी लागणारी तल्लीनता सारं काही तो करतो. त्यामुळेच या भूमिका प्रेक्षकांच्या मनात आणि डोक्यात भिनतात. विशेष म्हणजे काही वेळा हे कलाकार त्यांच्या भूमिकेमध्ये इतके समरसून जातात की त्या भूमिकेमागे नेमका कोणता अभिनेता किंवा अभिनेत्री आहे याचा प्रेक्षकांना विसर पडतो. सध्या अशाच एका अभिनेत्याचा साई बाबांच्या भूमिकेतील फोटो व्हायरल होत आहे.
सध्या सोशल मीडियावर एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये हा अभिनेता साई बाबांच्या वेशात दिसत असून तो मराठी कलाविश्वातील नावाजलेला अभिनेता आहे. सध्या हा अभिनेता भाग्य दिले तू मला या लोकप्रिय मालिकेत काम करताना दिसत आहे.
साई बाबांच्या वेशामध्ये दिसत असलेला हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून अभिनेता तुषार दळवी आहे. तुषार यांनी मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला त्यांचा हा फोटो शिर्डी के साईबाबा या हिंदी मालिकेतील आहे.
दरम्यान, तुषार दळवी सध्या भाग्य दिले तू मला या मालिकेत रत्नप्रभा यांच्या पतीची भूमिका साकारत आहेत. विशेष म्हणजे या मालिकेच्या माध्यमातून त्यांनी बऱ्याच वर्षांनी मराठी छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. तुषार यांनी सौ. शशी देवधर, जीवलगा, तांदळा, सदरक्षणाय, सनईचौघडे, बाईपण भारी देवा, देवराई अशा कितीतरी गाजलेल्या मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे.