'तुला पाहते रे' मालिकेतील गायत्री दातारविषयी या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 12:25 IST2018-10-01T12:23:19+5:302018-10-01T12:25:42+5:30

मालिकेतील ईशा निमकर ही प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडत आहे. पुण्याच्या गायत्रीने या मालिकेतून प्रमुख भूमिका सादर करत टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले आहे. पदार्पणातच तिला सुबोध भावे सोबत काम करण्याची संधी मिळाली

Did you know this things about Tula Pahate Re fame Gayatri Datar? | 'तुला पाहते रे' मालिकेतील गायत्री दातारविषयी या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

'तुला पाहते रे' मालिकेतील गायत्री दातारविषयी या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

झी मराठी वरील नवीनच सुरु झालेली 'तुला पाहते रे' ही मालिका सध्या तुफान गाजतेय. ही मालिका सुरु झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिका साकारत आहे. ईशा आणि विक्रांत सरंजामे यांची अनोखी कहाणी सगळ्यांना पसंत पडत आहे. विक्रांत सरंजामे म्हणजे शहरातील एक मोठा बिझनेसमन. खूप श्रीमंत, आलिशान घर असलेला विक्रम आणि दुसरीकडे चाळीत, मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी ईशा निमकर जी अतिशय सामान्य पार्श्वभूमीत वाढली आहे.

'तुला पाहते रे' मालिकेतील ईशा निमकर ही प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडत आहे. पुण्याच्या गायत्रीने या मालिकेतून प्रमुख भूमिका सादर करत टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले आहे. पदार्पणातच तिला सुबोध भावे सोबत काम करण्याची संधी मिळाली आणि या संधीचं तिने सोनं केले आहे. गायत्री दातार मालिकेत साकारत असलेली ईशा निमकर ही अत्यंत साधी आणि सोज्वळ मुलगी आहे. तिला जगातील छक्के पंजे कळत नाही. तसेच घरातील परिस्थितीमुळे तिची काही हौस-मौज तिला करता येत नाही. पण खऱ्या आयुष्यात गायत्री स्वतः खूप अॅडव्हेंचरस आहे. तिला ट्रेकिंगची तसेच फिरायची खूप आवड आहे. गायत्रीने मनालीला ट्रेकिंगचा आणि कोयना नदीत रिव्हर राफ्टिंगचा धमाल अनुभव घेतलेला आहे. गायत्रीने अनेक निर्सगरम्य ठिकाणी भेट दिली आहे त्यातील एक म्हणजे लेह लडाख. तिचे हे सर्व अनुभव तिने तिच्या सोशल मीडियावर फोटोंच्या रूपात शेअर केले आहेत. मालिकेतील गोंधळली ईशा खऱ्या आयुष्यात स्पष्टवक्ती आणि कॉलेजमध्ये प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेणारी उत्साही मुलगी आहे. गायत्रीचा हा वेगळा पैलू तिच्या चाहत्यांसमोर येत आहे. ऑनस्क्रीन साधी सरळ ईशा आणि ऑफस्क्रीन अॅडव्हेंचरस गायत्री या दोघींवर प्रेक्षक तितकाच प्रेमाचा वर्षाव करतात यात शंकाच नाही.

वय विसरायला लावणारी जगावेगळी प्रेम कहाणी असलेल्या 'तुला पाहते रे' या मालिकेतील गायत्रीला या मालिकेमुळे खूपच कमी दिवसांत प्रचंड फॅन फॉलॉव्हिंग मिळाले आहे यात काही शंकाच नाही. 

Web Title: Did you know this things about Tula Pahate Re fame Gayatri Datar?