​आशिष शर्माचा पृथ्वी वल्लभमधील नवा लूक पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 13:07 IST2018-03-06T07:37:38+5:302018-03-06T13:07:38+5:30

पृथ्वी वल्लभ ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली असून या मालिकेत दोन योद्धांची एक अनोखी कथा दाखवली जात आहे. ...

Did Ashish Sharma take a new look in Earth Vallabh? | ​आशिष शर्माचा पृथ्वी वल्लभमधील नवा लूक पाहिला का?

​आशिष शर्माचा पृथ्वी वल्लभमधील नवा लूक पाहिला का?

थ्वी वल्लभ ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली असून या मालिकेत दोन योद्धांची एक अनोखी कथा दाखवली जात आहे. या मालिकेची कथा युद्धभूमीतल्या द्वेषापासून सुरू झाली असून त्यात एक प्रेम कथा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या मालिके मध्ये आशिष शर्मा, सोनारिका भदोरिया, पवन चोप्रा, शालिनी कपूर, अलेफिया कपाडिया, जतिन गुलाटी, पियाली मुंशी, सुरेंद्र पाल यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. पृथ्वी वल्लभ या मालिकेसाठी सध्या आशिष शर्मा प्रचंड मेहनत घेत आहे. या मालिकेत आता तो ‘पायरेट्स ऑफ करेबियन’ मधील जॉनी डेपच्या प्रसिद्ध जॅक स्पॅरो लुकमध्ये दिसणार आहे. त्याच्यासारखीच तो टोपी घालणार असून चेहऱ्यावर तसाच मास्क देखील लावणार आहे. आशिष या मालिकेत प्रेक्षकांना एका वेगळ्या व्यक्तिरेखेत पाहायला मिळणार आहे. त्याच्या या नव्या व्यक्तिरेखेचे नाव धरती धकेल सिंह असे असणार आहे. 
पृथ्वी वल्लभच्या आगामी भागांमध्ये मृणाल म्हणजेच सोनारिका भदोरियाचे अपहरण झाले असल्याचे सिंधूराज सांगणार आहे. पण धरती धकेल सिंह म्हणजेच आशीष शर्मा हे छुपे रूप घेऊन मुखवटा घातलेल्या व्यक्तीकडून तिचा बचाव करणार आहे. आशिष त्याच्या या नव्या लूकसाठी खूप उत्सुक आहे. याविषयी तो सांगतो, “जॉनी डेप हे जागतिक चित्रपटातील एक अत्यंत प्रसिद्ध नाव आहे. पायरेट्स मालिकेतील त्याची जॅक स्पॅरो ही भूमिका अप्रतिम आहे. निर्मात्यांनी माझा लुक या जॅक स्पॅरोसारखा केला आहे. या लूकमुळे मी खूपच खूश आहे. लोकांना माझी ही व्यक्तिरेखा आवडावी यासाठी मी केवळ लुकच नाही तर माझ्या देहबोलीवर देखील खूप मेहनत घेतली आहे. मी या लुकचे संपूर्ण भारतीयकरण करून ग्रामीण बोली आणि देहबोलीने तो लुक देशी बनवला आहे. अस्सलता जपण्यासाठी मी या लुकसाठी माळवा प्रांताची बोली अंगिकारली आहे. हा अनुभव खूपच मजेशीर होता. माझ्या फॅन्सना देखील माझा हा लूक आवडेल याची मला खात्री आहे.”

Also Read : पृथ्वी वल्लभ फेम जितिन गुलाटी पडला प्रेमात

Web Title: Did Ashish Sharma take a new look in Earth Vallabh?