Video: धनश्री काडगावकरचा छोटा शेतकरी; स्ट्रॉबेरीच्या बागेत चिमुकल्या कबीरने वेधलं साऱ्यांचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 16:33 IST2022-03-10T16:32:30+5:302022-03-10T16:33:10+5:30
Dhanashri kadgaonkar: धनश्रीने सध्या तिचा कलाविश्वातील वावर थोडा कमी केला असून ती तिचा जास्तीत जास्त वेळ लेक कबीरसोबत घालवते.

Video: धनश्री काडगावकरचा छोटा शेतकरी; स्ट्रॉबेरीच्या बागेत चिमुकल्या कबीरने वेधलं साऱ्यांचं लक्ष
मराठी कलाविश्वात वहिनीसाहेब या नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर. उत्तम अभिनयामुळे ओळखल्या जाणाऱ्या धनश्रीला तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे एक वेगळी ओळख मिळाली. या मालिकेतील तिची भूमिका प्रचंड गाजली. त्यामुळे आजही ती प्रेक्षकांमध्ये कायम चर्चेत असते. यात अनेकदा ती तिच्या बाळासोबतचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. यात तिच्या लाडक्या लेकाचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.
धनश्रीने सध्या तिचा कलाविश्वातील वावर थोडा कमी केला असून ती तिचा जास्तीत जास्त वेळ लेक कबीरसोबत घालवते. यात ती अनेकदा तिच्या लेकाचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलिकडेच तिने कबीरचा स्ट्रॉबेरीच्या बागेतील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो बागेत मस्त बागडताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्याने स्वत:च्या हाताने झाडाला लागलेली स्ट्रॉबेरी तोडून तोंडात टाकली ज्यामुळे धनश्रीला कमालीचा आनंद झाल्याचं दिसून येत आहे.
"कबीर साठी हा सगळा पहिलाच अनुभव होता ..त्याला नक्कीच मजा आली असावी ...सुरुवातीला मला वाटलं, नं धुतलेल्या स्ट्राबेरी कशा त्याला खायला द्याव्या, पण त्याला काई सांगेपर्यंत त्याने ती खायला सुरुवात केली होती ...एरवी सगळं steralise n all करणारी मी तिथे काही च नाही करू शकले .. पण या अनुभवाला तोड नव्हती, त्याने स्वतः ती स्ट्राबेरी तोडून स्वतः पहिल्यांदा खाल्ली .. मजा आली मला त्याला असं बघून ...आपली माती आपली माणसं ...", असं कॅप्शन तिने या व्हिडीओला देत तिच्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, धनश्री कायम सोशल मीडियावर तिच्या बाळाचे व्हिडीओ शेअर करत असते. इतकंच नाही तर ती त्याच्यासोबत अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होणारे ट्रेंडही फॉलो करते.