देवयानी फेम संग्राम साळवीची पत्नीदेखील आहे अभिनेत्री, पाहा त्यांचा फॅमिली फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2022 06:00 IST2022-09-25T06:00:00+5:302022-09-25T06:00:00+5:30

Sangram Salvi: देवयानी मालिकेत संग्रामची भूमिका संग्राम साळवी याने साकारली आहे. त्याला या मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली आहे.

Devyani fame Sangram Salvi's wife also famous actress, see their family photo | देवयानी फेम संग्राम साळवीची पत्नीदेखील आहे अभिनेत्री, पाहा त्यांचा फॅमिली फोटो

देवयानी फेम संग्राम साळवीची पत्नीदेखील आहे अभिनेत्री, पाहा त्यांचा फॅमिली फोटो

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका देवयानीनं प्रेक्षकांचा निरोप घेऊन बराच काळ उलटला आहे. तरीदेखील या मालिकेतील संग्राम आणि देवयानीची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावली होती. मालिकेत संग्रामची भूमिका संग्राम साळवी याने साकारली आहे. त्याला या मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली आहे. संग्राम साळवीच्या पत्नीबद्दल तुम्हाला माहिती आहे का, आम्ही तुम्हाला तिच्याबद्दल सांगतो. तीदेखील प्रसिद्ध अभिनेत्री असून तिचे नाव खुशबू तावडे आहे. तसेच संग्राम आणि खुशबूला एक मुलगा आहे. नुकतेच खुशबूने इंस्टाग्रामवर त्यांचा फॅमिली फोटो शेअर केला आहे.

खुशबू आणि संग्राम सध्या त्यांच्या बाळामुळे चर्चेत येत असतात. ते दोघे अनेकदा त्यांच्या बाळाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. मात्र, यावेळी खुशबूने तिच्या त्रिकोणी कुटुंबाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिची हॅप्पी फॅमिली दिसून येत आहे.


दरम्यान, खुशबूने २ नोव्हेंबर २०२१ मध्ये एका चिमुकल्या मुलाला जन्म दिला. त्याचं नाव राघव ठेवलं आहे. खुशबू आणि संग्राम मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. या दोघांनी 'देवयानी' या मालिकेत एकत्र काम केलं होतं.

खुशबू 'एक मोहोर अबोल', 'देवयानी', 'पारिजात', 'धर्मकन्या', 'मेरे साई', 'तेरे बिन', 'आम्ही दोघी', अशा काही हिंदी मराठी मालिकेत झळकली आहे.

Web Title: Devyani fame Sangram Salvi's wife also famous actress, see their family photo