भीमाशंकरला पोहोचली टीव्हीची 'गोपी बहू', मुस्लीम पतीसोबत घेतलं दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 10:42 IST2025-06-30T10:42:15+5:302025-06-30T10:42:47+5:30
देवोलिना भट्टाचार्जीनं शंकराची पूजा केली आणि आशीर्वाद घेतला.

भीमाशंकरला पोहोचली टीव्हीची 'गोपी बहू', मुस्लीम पतीसोबत घेतलं दर्शन
फिल्म इंडस्ट्रीत अनेक सौंदर्यवतींनी प्रेमविवाह केले. अनेक हिंदू अभिनेत्रींनी मुस्लिम जोडीदार निवडले. आंतरधर्मीय विवाह केल्यानंतर या अभिनेत्रींना खूप विरोध सहन करावा लागला पण, त्यांनी कोणाचीही पर्वा केली नाही. त्यापैकीच एक म्हणजे टीव्हीची 'गोपी बहू' म्हणजे अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी. नुकतंच देवोलिना आसामच्या गुवाहाटीमधल्या भीमाशंकर (Bhimasankar Dham Jyotirlinga Temple Guwahati)मंदिरात दर्शनासाठी पोहोचली होती. यावेळी तिचा मुस्लीम पती शाहनवाज आणि तिचा मुलगा तिच्यासोबत होता.
देवोलिना भट्टाचार्जीनं शंकराची पूजा केली आणि आशीर्वाद घेतला. सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये पारंपारीक लूकमध्ये ती दिसून आली. फोटोंसोबत तिनं कॅप्शनमध्ये लिहलं, "गुवाहाटी येथील भीमाशंकर धाम येथे भेट देण्याचा शुभयोग लाभला. निसर्गाच्या कुशीत वसलेलं भगवान शंकरांचं हे पवित्र स्थान अत्यंत शांततामय आणि आध्यात्मिकतेने भरलेलं आहे. हे केवळ एक धार्मिक ठिकाण नाही, तर आपल्या सभोवताल असलेल्या दिव्य ऊर्जेची आठवण करून देणारं एक अमूल्य रत्न आहे. विश्वास, शांती आणि नित्य भक्तीच्या साक्षीने कुटुंबासोबत घालवलेले हे क्षण मनापासून आठवणीत राहतील, यासाठी अत्यंत कृतज्ञ आहे", या शब्दात तिनं आपल्या भावना व्यक्त केल्या. देवोलीनाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
'साथ निभाना साथियाँ' या मालिकेत गोपी बहूची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली देवोलीना हिनं २०२२ मध्ये शाहनवाज शेखशी आंतरधर्मीय लग्न केलं होतं. शाहनवाज हा एक जीम ट्रेनर आहे. लग्नानंतर दोन वर्षांनी देवोलिना आणि शाहनवाज हे आईबाबा झाले. देवोलिनाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. पण, 'साथ निभाना साथिया'शिवाय 'लाल इश्क', 'छटी मैया की बिटिया' या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. 'बिग बॉस', 'डान्स इंडिया डान्स' या शोमध्येही ती सहभागी झाली होती.