विकास मांकाटला ने घेतले पोलोचे शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 12:44 IST2019-03-02T12:39:33+5:302019-03-02T12:44:10+5:30
कलर्सच्या नाट्यमयी अशा खूब लडी मर्दानी झांसी की रानी मध्ये मणिकर्णिका आणि ब्रिटिशांच्या विरोधातील तिचा लढा दाखवण्यात आला आहे. ...

विकास मांकाटला ने घेतले पोलोचे शिक्षण
कलर्सच्या नाट्यमयी अशा खूब लडी मर्दानी झांसी की रानी मध्ये मणिकर्णिका आणि ब्रिटिशांच्या विरोधातील तिचा लढा दाखवण्यात आला आहे. या शोमध्ये केवळ पराक्रमाचीच गोष्ट नव्हे तर मानसिक चढउतार आणि एका युवतीने तिच्या अडचणींवर केलेली मात ही दाखवण्यात आली आहे.

त्यावेळच्या कालावधीत जात असतांना प्रेक्षकांना आता एका विशिष्ट प्रसंगात पोलो खेळतांना ही दाखवण्यात आले आहे. विकास मांकाटला जो गंगाधरची भुमिका करत आहे त्याने या प्रसंगाकरता पोलोचे शिक्षणही घेतले आहे. पोलो हा खेळ हेल्मेट, रायडींग बुट्स आणि कॉलरचा शर्ट घालून खेळायचा खेळ असला तरीही विकास मंकाटला ने १० किलो वजनाच्या शाही सूट मध्ये हा खेळणे पसंत केले. शेवटच्या दिवसाच्या आधी त्याने घोड्यावर बसण्याचे ही प्रशिक्षण सेटवर घेतले, त्यासाठी खूपच खेळकर असा घोडा रॉकी आणला होता. त्याने आता हा घोडा दत्तक घेण्याचेही ठरवले आहे. त्याचबरोबर जेंव्हा केंव्हा वेळ मिळतो त्यावेळी तो त्याच्या या मनपसंद अशा घोड्या बरोबर वेळ घालवतो.
या प्रसंगा विषयी बोलतांना विकास मांकाटला म्हणतो “ एक नट म्हणून मी नवीन भुमिकांवर काहीतरी प्रयोग करत असतो व आव्हानेही त्यानुसार स्विकारत असतो. हा प्रसंग सुध्दा खूपच आव्हानात्मक होता कारण यावेळी पोलो गेम खेळायचा होता आणि हा मी कधीच खेळलेलो नव्हतो. यासाठी खूपच सराव लागतो. यांतील सर्वांत महत्त्वपूर्ण गोष्ट अशी की १० किलो वजनाचा पोशाख घालून खेळणे, हा प्रयत्न मी केला आणि मी सर्वांत चांगला शॉट दिला. घोड्यावर बसणे माझी आवड आहे आणि या प्रसंगामुळे मला ही आवड पुढे जोपासण्याची संधी या प्रसंगामुळे मिळाली.”